अखेर आखाड्यांच्या जागेचा वाद मिटला

By admin | Published: August 8, 2015 11:49 PM2015-08-08T23:49:22+5:302015-08-08T23:50:12+5:30

अखेर आखाड्यांच्या जागेचा वाद मिटला

After all, the issue of akhada's land dispute ended | अखेर आखाड्यांच्या जागेचा वाद मिटला

अखेर आखाड्यांच्या जागेचा वाद मिटला

Next

नाशिक : अखिल भारतीय दिगंबर अनी आखाड्यात बाहेरगावहून आलेले भाविक आणि श्री पंच तेराभाई त्यागी खालसा यांच्यात जागेच्या हक्कावरून वाद निर्माण झाला होता. परंतु दिगंबर अनी आखाड्यामार्फत कोणत्याही जागेच अन्नक्षेत्र सुरू करण्यात आलेले नाही, याठिकाणी असलेला जागेचा वाद मिटला आहे, असे वक्तव्य दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी केले.
साधुग्राममध्ये जनार्दनस्वामी आश्रम ते लक्ष्मीनारायण मंदिर या मुख्यरस्त्यावर सेक्टर-१ बी मध्ये एका प्लॉटवरून अखिल भारतीय दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री विश्वंभरदास यांच्या शिष्यपरिवाराने अन्नछत्र सुरू केल्याचे सांगत बाहेरगावहून आलेले भाविक तेथे भोजन व पूजापाठ करत असत. त्याचवेळी या प्लॉटवर आमचा ताबा असल्याचे अखिल भारतीय पंच तेराभाई त्यागी आखाड्याचे महंत बिजमोहनदास महाराज आणि त्यांच्या शिष्यांनी दावा केला होता. त्यातून वाद निर्माण झाला होता. यासंबंधी महंत रामकिशोर शास्त्री यांनी सांगितले की, अशा प्रकारे दिगंबर आखाड्याने कोणतेही अन्नछत्र सुरू केलेले नाही तसेच येथील असलेला जागेचा वाद मिटला आहे.
दरम्यान, कुंभमेळ्यासाठी दिगंबर आखाड्याच्या जवळपास १००हून अधिक खालशांना जागा मिळाली नसल्याची ओरड महंत कृष्णदास महाराज यांनी केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शनिवारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिगंबर आखाड्यात धाव घेऊन सुमारे १९ खालशांना जागावाटप केली आहे.
खालशांना सेक्टर १ व २ सेक्टरमध्ये जेथे मोकळे प्लॉट आहेत त्याठिकाणी जागा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाने एकीकडे जागावाटप करण्याचे काम सुरू केले असले तरी अजूनही जागावाटपाच्या याद्यांमध्ये नावात चुका असल्याने अडचण निर्माण झाली आहे.

Web Title: After all, the issue of akhada's land dispute ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.