लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जे.जे. कला महाविद्यालयात गुरुवारी आयोजित केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट सार्थकी ठरली आहे. वर्षानुवर्षे रखडलेला जे.जे. कला महाविद्यालयाचा अभिमत कला विद्यापीठाच्या घोषणेला हिरवा कंदील आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अभिमत कला विद्यापीठाचा प्रस्ताव पाठवून वर्ष झाल्याने ही प्रक्रिया थंडावली होती. परंतु, जे. जे. कला, जे. जे. उपयोजित कला आणि सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालयांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मान्य व्हावा यासाठी संस्थेतील अनेक वरिष्ठ अधिकारी इच्छुक होते. आता या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर स्वतंत्र विद्यापीठाचे हक्क मिळणार संस्थेला मिळणार आहे. त्यामुळे काळानुरुप मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणारे अभ्यासक्रम येत्या टप्प्याटप्प्याने बंद करून संपूर्णतः नवीन अभ्यासक्रम या कला विद्यापीठाकडून राबविली जाणार असल्याची माहिती जे. जे.च्या वरिष्ठ प्राचार्यांनी दिली आहे.
कला क्षेत्रात नाराजीजे. जे. कला महाविद्यालयातील कला प्रदर्शनाचा घाट अभिमत विद्यापीठाच्या घोषणेसाठी घातला गेला अशी चर्चा कला क्षेत्रात होती. ही चर्चा खरी ठरल्याने कला क्षेत्रातील तज्ज्ञांनी व कला रसिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे कलेची वैभवशाली परंपरा असलेल्या वास्तूत उद्योग आणि व्यावसायिकांची घुसखोरी होऊन खासगीकऱणाने संस्था संपुष्टात येईल, अशी भावना तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अभिमत विद्यापीठाच्या दर्जामुळे आता लवकरच जे. जे. महाविद्यालय जागतिक कलेचे केंद्र होईल. तिसरी ते १२वीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांवर भारतीय परंपरा, संस्कृती, खेळ, परंपरेची माहिती देण्यासाठी चित्रे काढण्याची जबाबदारी या महाविद्यालयावर सोपविली जाईल. तरुणांमधील कौशल्य विकासासाठी अभ्यासक्रमही तयार करावा. - धर्मेद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री