Join us  

अखेर पेंग्विन दर्शन महागलेच

By admin | Published: May 27, 2017 2:36 AM

भायखळ्यातील प्रसिद्ध राणीबाग व पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात प्रस्तावित दरवाढीला विरोध होत असल्याने, शिवसेनेने दर कमी करण्याची तयारी दाखवली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळ्यातील प्रसिद्ध राणीबाग व पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात प्रस्तावित दरवाढीला विरोध होत असल्याने, शिवसेनेने दर कमी करण्याची तयारी दाखवली. मात्र, केवळ प्रौढांसाठी सुचवलेले प्रत्येकी शंभर रुपये दर ५० रुपयांवर आणण्याची खेळी शिवसेनेने केली. त्यात भाजपाचा लटका विरोध आणि काँग्रेसच्या समर्थनामुळे दरवाढीच्या या प्रस्तावाला बहुमताच्या जोरावर स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी हिरवा कंदील मिळाला. ही दरवाढ रोखण्यात अपयशी ठरलेल्या पहारेकऱ्यांनी सभात्यागावरच समाधान मानले. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या महासभेपुढे पाठवण्यात येणार आहे. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही दरवाढ लागू होणार आहे.राणीबागेचे प्रवेश शुल्क १९९६ नंतर २००३ मध्ये वाढवण्यात आले. मात्र, त्यानंतरही मुलांसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी पाच रुपये दर होते. पेंग्विन आणल्यानंतर राणी बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, या प्रस्तावाला सर्वच स्तरातून विरोध सुरू केला. याचा फायदा उठवत, भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली होती. भाजपाचे संख्याबळ समान असल्याने हा प्रस्ताव फेटाळला गेल्यास नाचक्की होईल, याची शिवसेनेला धास्ती वाटू लागली. त्यामुळे दरवाढीवर फेरविचार करण्यास शिवसेनेने सुरुवात केली.त्यानुसार, स्थायी समितीच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव शुक्रवारी आला असता, शिवसेनेने दर कमी करण्याची उपसूचना मांडली. त्यानुसार, प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर रुपये दर ५० वर आणण्यात आले. मात्र, कुटुंबासाठी प्रवेश दर व राणीबागेत मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांकरिता सुचवण्यात आलेले प्रवेश शुल्क तेवढेच ठेवण्यात आले. राणीबागेचे काम अद्याप अर्धवट असताना ही दरवाढ योग्य नाही, सुविधा देत नाही, तर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांना शुल्क का? असा सवाल भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. समाजवादीने हा प्रस्ताव परत पाठवून द्या, अशी सूचना केली. मात्र, या प्रस्तावाला काँग्रेसने समर्थन दिले. यामुळे बळ मिळालेल्या शिवसेनेने या विषयावर मतदान घेऊन बहुमताने प्रस्ताव मंजूर केला. कधीपासून दरवाढ?स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेच्या महासभेत पुढील मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल. तेथेही मंजुरी मिळाल्यानंतर त्या महिन्याच्या नंतरच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही शुल्कवाढ लागू होणार आहे.असे आहेत दरात बदल राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : १०० रुपयांऐवजी ५० रुपये ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी : २५ रुपये कुटुंबासाठी : २ प्रौढ व ३ ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १00 रुपये अतिरिक्त प्रत्येक ३ वर्षांवरील मुलांसाठी २५ रुपये व १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी शंभरऐवजी ५० रुपये.मुंबईकरांना फटकागेल्या सहा महिन्यांपासून बहुतांश रस्ते खोदलेले आहेत. त्यांची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. दुरुस्ती करण्याऐवजी चांगले रस्ते खोदण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्यास पावसाळ्यात त्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसेल, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली. तीनशेहून अधिक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. येत्या पाच दिवसांत ही कामे पूर्ण होतील का, असा प्रश्न नगरसेवकांनी केला. शालेय विद्यार्थ्यांसाठी...पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : नि:शुल्कखासगी शाळांतील तीन ते १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : १५ रुपयेखासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : २५ रुपयेसकाळी सहा ते आठपर्यंत चालण्यासाठी : मासिक १५0 रुपये. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंदज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : नि:शुल्कफोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १00 रुपये व्हिडीओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३00 रुपये