अखेर ‘त्या’ टोळीचा पर्दाफाश, जवानाच्या ओळखपत्राचा गैरफायदा घेत लूटमार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:35 AM2019-04-18T06:35:42+5:302019-04-18T06:35:49+5:30

स्वस्तात सोने, वाहन विक्रीच्या नावाखाली जवानांचे ओळखपत्र मिळवायचे. याच ओळखपत्राचा आधार घेत, फसवणूक करणाऱ्या राजस्थानी टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला.

After all, they were exposed to the gang, robbery taking advantage of Jawan's identity card | अखेर ‘त्या’ टोळीचा पर्दाफाश, जवानाच्या ओळखपत्राचा गैरफायदा घेत लूटमार

अखेर ‘त्या’ टोळीचा पर्दाफाश, जवानाच्या ओळखपत्राचा गैरफायदा घेत लूटमार

Next

मुंबई : स्वस्तात सोने, वाहन विक्रीच्या नावाखाली जवानांचे ओळखपत्र मिळवायचे. याच ओळखपत्राचा आधार घेत, फसवणूक करणाऱ्या राजस्थानी टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. यातील आरोपीच्या अटकेनंतर, आरोपीच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. शाहिकत असीम अमीन (२२) असे अटक आरोपीचे नाव आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफच्या जवानांना या टोळीने लक्ष्य केले होते. सुरुवातीला विविध संकेतस्थळांवर स्वस्तात मोबाइल, वाहन, सोने विक्रीचे आमिष दाखवायचे. सावज जाळ्यात अडकताच व्यवहाराच्या बहाण्याने त्यांचे ओळखपत्र मिळवायचे व त्या आधारे सामान्य नागरिकांशी व्यवहार करत ते त्यांची फसवणूक करायचे.
सायबर पोलिसांच्या तपासादरम्यान, या मंडळींचे राजस्थान कनेक्शन उघड झाले. येथील घोंगर, गढी, झीलपट्टी झेंझपुरी या गावांमध्ये ते राहात असल्याची माहिती समोर आली. तपास पथकाने तेथे धाव घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाला अटक केली. ही बाब गावात पसरताच नातेवाइकांनी अटकेस विरोध करत पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. मात्र पोलिसांनी तेथून आमीनला घेऊन मुंबई गाठली. असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: After all, they were exposed to the gang, robbery taking advantage of Jawan's identity card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.