जागांचे वाटप झाल्यानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 02:26 AM2018-10-23T02:26:31+5:302018-10-23T02:26:33+5:30

बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

 After the allocation of seats, take action against unauthorized hawkers! | जागांचे वाटप झाल्यानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा!

जागांचे वाटप झाल्यानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा!

googlenewsNext

मुंंबई : बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार, लवकरच अधिकृत फेरीवाल्यांना जागा निश्चित करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गेले काही महिने थंडावलेल्या मनसेने फेरीवाल्यांचा मुद्दा उचलला आहे. जागांचे वाटप झाल्यानंतर मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा, अन्यथा मनसे स्टाईलने कारवाई करू, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाला सोमवारी दिला.
मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांमध्ये जागांचे वाटप पालिकेने सुरू केले आहे. यासाठी फेरीवाल्यांना अधिवासाचा प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात आली आहे.
या प्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने पालिका मुख्यालयात आयुक्त अजय मेहता यांची सोमवारी भेट घेतली. पथविक्रेत्यांची नोंदणी करताना महाराष्ट्राच्या अधिवासाच्या सर्व तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी केली. 

>अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक
काही दिवसांपूर्वी बोरीवली ते चेंबूर पट्ट्यात अधिकृत फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा नेमून दिल्या. शासनाच्या नियमानुसार पथविक्रेता महाराष्ट्रातील अधिवासी असावा, असे स्प्ष्ट केले असल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. अधिकृत फेरीवाल्यांना परवाना देताना अधिकाºयांकडून कुठेही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, तसेच त्यानंतर अनधिकृत फेरीवाला दिसल्यास संबंधित अधिकाºयाला ताबडतोब बडतर्फ करावे, अशी मागणी मनसेने केली. यावर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.ली जावी. अधिकृत फेरीवाल्यांच्या प्रक्रियेवर आमचे लक्ष राहील, असा इशारा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र कार्यकर्त्यांनी आयुक्तांना दिले.

Web Title:  After the allocation of seats, take action against unauthorized hawkers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.