Join us

'अॅमेझॉन'ला धडा शिकवल्यानंतर मनसेचा मोर्चा आता 'डॉमिनोज'कडे!

By मोरेश्वर येरम | Published: December 31, 2020 8:20 PM

'डॉमिनोज'च्या 'मोबाइल अॅप'मध्ये मराठी भाषेचा पर्याय नाही. तो तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी मनसेने केली आहे.

ठळक मुद्दे'डोमिनोज'च्या अॅपवर मराठी भाषेचा पर्याय देण्याची मनसेची मागणीमनसेच्या मागणीची डोमिनोजने घेतली तातडीने दखललवकरच मराठीचा पर्याय उपलब्ध करुन देण्याचं दिलं आश्वासन

मुंबईमराठीच्या मुद्द्यावरुन 'अॅमेझॉन' या ऑनलाइन शॉपिंग साइटला धडा शिकवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता 'डॉमिनोज' या पिझ्झा आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीकडे वळवला आहे. 

'डॉमिनोज'च्या 'मोबाइल अॅप'मध्ये मराठी भाषेचा पर्याय नाही. तो तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी मनसेने केली आहे. डॉमिनोजनेही याची दखल घेत "आम्ही लवकरच आमच्या मोबाइल अॅप्लिकेशनवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन देऊ", असं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेने 'अॅमेझॉन'विरोधात मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत आंदोलन केलं होतं. पण 'अॅमेझॉन'ने राज ठाकरेंविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतल्याचं लक्षात येताच मनसेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात अॅमेझॉनचे कार्यालय फोडल्याचीही घटना समोर आली होती. मनसेच्या खळखट्याक आंदोलनानंतर 'अॅमेझॉन'ने माघार घेत येत्या आठवड्याभरात संकेतस्थळावर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं.  

टॅग्स :मनसेराज ठाकरेअ‍ॅमेझॉन