Join us

बाद अर्जदारांना पुन्हा संधी

By admin | Published: April 30, 2015 1:58 AM

म्हाडाच्या घरांकरिता ज्यांनी केलेले अर्ज सदोष असल्याने बाद ठरवले गेले, त्यांना १५ मेपर्यंत पुन्हा अर्ज दाखल करण्याची संधी देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.

मुंबई : म्हाडाच्या घरांकरिता ज्यांनी केलेले अर्ज सदोष असल्याने बाद ठरवले गेले, त्यांना १५ मेपर्यंत पुन्हा अर्ज दाखल करण्याची संधी देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. या निर्णयाचा लाभ अर्ज बाद ठरलेल्या २ हजार जणांना होणार आहे.अर्ज करणाऱ्या काही अर्जदारांनी पुरेशी माहिती न देणे, फोटो योग्य पद्धतीने न लावणे किंवा अर्जासोबत देवदेवतांचे फोटो लावणे, अशा चुका केल्याने सुमारे दोन हजार अर्ज बाद झाले होते. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना असे आदेश दिले, की घराकरिता अर्ज करण्याची मुदत अजून संपलेली नाही. १५ मेपर्यंत ही मुदत असल्याने पुन्हा अर्ज करण्याची संधी या अर्जदारांना दिली पाहिजे. तसे एसएमएस ज्यांचे अर्ज बाद ठरले त्यांना पाठवले जातील, असे वायकर यांनी सांगितले.