आश्वासनानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन डॉक्टरांचे आंदाेलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 06:44 AM2021-04-16T06:44:03+5:302021-04-16T06:44:20+5:30
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय अध्यापक संघटनेचे डॉ. सचिन मुळकूटकर व डॉ. गोलावार, वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या डॉ. रेवत कवींदे आदींसाेबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगने बैठक घेतली.
मुंबई : राज्यातील सर्व शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयांमधील आणि रुग्णालयांतील डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी कामबंद आंदाेलन केले. मात्र आश्वासनानंतर आंदाेलन मागे घेतले.
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय अध्यापक संघटनेचे डॉ. सचिन मुळकूटकर व डॉ. गोलावार, वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या डॉ. रेवत कवींदे आदींसाेबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगने बैठक घेतली. यावेळी या महाविद्यालयांतील सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित वेतन श्रेणीनुसार वेतनाचा प्रस्ताव तातडीने सादर करा, ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा दोन वर्षे झाली त्यांच्या सेवा कायम करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.