नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ लक्षात घेऊन तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लीटरमागे अनुक्रमे ३ रुपये १८ पैसे आणि डिझेल ३ रुपये ०९ पैसे वाढीची घोषणा शनिवारी केली. ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच लागू झाली. यापूर्वी १६ फेब्रुवारीला पेट्रोल लीटरमागे ८२ पैसे तर डिझेल ६१ पैशांनी महागले होते. तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली घसरल्याने गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यानंतर पेट्रोलच्या किमती दहावेळा आणि आॅक्टोबर २०१४नंतर डिझेल सहावेळा स्वस्त झाले होते.
अर्थसंकल्पानंतर लगेच पेट्रोल, डिझेल महागले
By admin | Published: March 01, 2015 2:57 AM