Join us

विद्यार्थ्यांच्या मोर्चानंतर नाला होणार साफ

By admin | Published: June 13, 2014 1:38 AM

या नाल्याच्या परिसरात शाळा व महाविद्यालय असून त्यात हजारो विद्यार्थी शिकत आहेत या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून त्यांना अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका प्रशासन खाडीकडे जाणारा मुख्य नाला गेली दोन वर्षे सतत पाठपुरावा करूनही साफ करत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्राचार्यांसह महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. भार्इंदर पूर्वेकडे एमआय उद्योग, हनुमाननगर, गोडदेव नाका ते समुद्रकिनारा असा मुख्य नाला आहे. २० फूट रुंद आणि १६ फूट खोल असलेल्या या नाल्यात ५ ते ६ फूट गाळ साचला आहे. या नाल्याच्या परिसरात शाळा व महाविद्यालय असून त्यात हजारो विद्यार्थी शिकत आहेत या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून त्यांना अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. महापालिका नालेसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे बुधवारी एस.एन. कॉलेजचे प्राचार्य विष्णू यादव, प्रवीण पाटील कॉलेजच्या रंजना पाटील, महेश म्हात्रे, नगरसेवक रोहिदास पाटील, कल्पना म्हात्रे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले. उपायुक्त संभाजी पानपट्टे यांनी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)