Join us

तळोजापाठोपाठ सांगलीतील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:56 AM

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तळोजापाठोपाठ सांगलीतील एमडी तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारत त्याला टाळे ठोकले आहे.

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तळोजापाठोपाठ सांगलीतील एमडी तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारत त्याला टाळे ठोकले आहे. पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत १३३ किलो ९०० ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला.गेल्या आठवड्यात एटीएसने तळोजाजवळील वलप गावातील एमडी निर्मितीच्या कारखान्यावर छापा घालत या अमलीपदार्थाची निर्मिती, वितरण, वाहतूक करणारी साखळी उद्ध्वस्त केली. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे १२९ किलो एमडीचा साठा आणि एक कोटीची रोकड सापडली. वलप येथील कारखान्यात नेमक्या रासायनिक प्रक्रिया करून एमडीची निर्मिती करणाºया सरदार पाटील या सांगलीतील तरुणाला एटीएसने १४ तारखेला अटक केली. पाटील रासायनिक प्रक्रिया करण्यात पारंगत होता. पाटील हा रसायन शास्त्रामध्ये पदवीधर असून तो २०१५ मध्ये सांगलीच्या ओम्कार इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून कामाला होता. तेथे काम करीत असताना एमडी बनविण्याबाबतचे प्राथमिक ज्ञान त्याला मिळाले. त्यातूनच सांगली जिल्ह्यात एमडीनिर्मितीचा दुसरा अद्ययावत कारखाना सुरू केल्याची धक्कादायक माहिती पथकाच्या हाती लागली. पथकाने कारखान्यातील नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.दोन्ही कारखान्यांमध्ये मिळून आलेल्या कच्च्या मालावरून ही मंडळी २५ किलो एमडीचे उत्पादन करणार असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात वितरण करणाºया आणखी दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चार किलो ९०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३३ किलो ९०० ग्रॅम एमडी तसेच पंचवीस किलोग्रॅम एमडी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि एक कोटी साडेबारा लाखांची रोकड जप्त करण्यात यश आले आहे.>तस्करांना ‘सुलभ’ आधारशहरातील सुलभ शौचालये अमलीपदार्थांची गोदामे आणि विक्री केंद्रे बनल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पश्चिम उपनगरातील वांद्रे येथील एका शौचालयात दडविलेला एमडी या अमलीपदार्थाचा अडीच किलो साठा एटीएस पथकाने हस्तगत केला होता.