‘आलं’ गेलं भाव खाऊन,  तरीही चहा जैसे थे ! शहरांत फ्युजन चहाचा पर्याय उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:53 PM2023-05-24T12:53:14+5:302023-05-24T12:53:40+5:30

चहाप्रेमींची सुस्ती मात्र त्याचा एक घोट घेतल्याशिवाय जात नाही.

After eating 'Alam', it was still like tea! Fusion tea option available in cities | ‘आलं’ गेलं भाव खाऊन,  तरीही चहा जैसे थे ! शहरांत फ्युजन चहाचा पर्याय उपलब्ध

‘आलं’ गेलं भाव खाऊन,  तरीही चहा जैसे थे ! शहरांत फ्युजन चहाचा पर्याय उपलब्ध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वत्र कडक ऊन असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तरीही चहाप्रेमींची सुस्ती मात्र त्याचा एक घोट घेतल्याशिवाय जात नाही. त्यातही विशेषत: आल्याच्या चहाची क्रेझ भारी आहे. ज्याचा दर सध्या कडाडला आहे. मात्र, त्यामुळे शहरात तयार चहाच्या किमती वाढविलेल्या नसून उलट फ्युजन टी चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आल्याचा भाव @ २०० रुपये
आल्याची आवक ही नाशिक, यवतमाळमधून होते. मात्र, सध्या ती फक्त बंगळुरूमधून होत आहे. परिणामी, आल्याचे दर हे १६० ते २०० रुपयांवर गेले आहेत. एकंदरच काय तर मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने भाव वाढले आहेत.
- अमित जडेजा, भाजी विक्रेता

चायनीजमध्ये कम-जादा
आल्याचा सर्वाधिक वापर चायनीज, मोमो, वडापाव यांसारख्या स्टॉल्सवर होतो. त्यामुळे विक्रेते हे त्याचे प्रमाण कमी- जास्त करून पदार्थ बनवितात. जिभेवर रेंगाळलेल्या चवीसाठी थोडेफार नुकसान सोसावे लागते. कारण चवीसाठीच ग्राहक आमच्याकडे वळतात आणि जर अन्नपदार्थ बेचव झाले तर ग्राहक तुटू शकतो.

चहाला सोबत ‘फ्युजन’ची
सध्या चहाला ‘मसाला टी’, ‘इलायची टी’ तसेच ‘तुलसी - जिंजर टी’ ‘लेमन टी’ सारखे पर्याय उपलब्ध करून देत आहोत. आल्यात औषधी गुणधर्म असल्याने उकाड्यातही चहाप्रेमींची आल्याच्या चहाची मागणी घटलेली नाही. मात्र, आम्ही किमती वाढवू शकत नाही, कारण  आमच्यासाठी ग्राहक हा महत्त्वाचा आहे. काहीजण गवती चहा टाकूनही चहाची मागणी करतात. मात्र, त्याची चव ही सहज अनेकांच्या लक्षात येत नाही. तुळस आणि आल्याचे कॉम्बिनेशन हे शरीरात इम्युनिटी बुस्टरचे काम करते. त्यानुसार आम्ही ग्राहकांना त्यांच्या आवडीचा चहा पुरवितो.
- सतीश तोलानी, चहा विक्रेते

अन्य भाजीपालाही महागला!
भाजी दर (प्रती किलो)
आले    १६० ते २००
कोबी    ६० 
फ्लॉवर    ८०
फरसबी    १६०
वांगे मोठे    ८०
वांगे छोटे    ६०
बटाटा        २४
कांदे        २४
मटार    १००
तोंडली    ८०
गवार    १००
सुरण    ८०
भेंडी    ८० 
टोमॅटो    ३० 
शिरली    ८०
घोसाळी    ८०
अरबी    १००
भोपळी    ८०
भोपळा    ६० 
पडवळ    ८०
लिंबू (एक नग)  पाच ते आठ रुपये
 

Web Title: After eating 'Alam', it was still like tea! Fusion tea option available in cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.