Join us

‘आलं’ गेलं भाव खाऊन,  तरीही चहा जैसे थे ! शहरांत फ्युजन चहाचा पर्याय उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:53 PM

चहाप्रेमींची सुस्ती मात्र त्याचा एक घोट घेतल्याशिवाय जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वत्र कडक ऊन असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तरीही चहाप्रेमींची सुस्ती मात्र त्याचा एक घोट घेतल्याशिवाय जात नाही. त्यातही विशेषत: आल्याच्या चहाची क्रेझ भारी आहे. ज्याचा दर सध्या कडाडला आहे. मात्र, त्यामुळे शहरात तयार चहाच्या किमती वाढविलेल्या नसून उलट फ्युजन टी चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आल्याचा भाव @ २०० रुपयेआल्याची आवक ही नाशिक, यवतमाळमधून होते. मात्र, सध्या ती फक्त बंगळुरूमधून होत आहे. परिणामी, आल्याचे दर हे १६० ते २०० रुपयांवर गेले आहेत. एकंदरच काय तर मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने भाव वाढले आहेत.- अमित जडेजा, भाजी विक्रेता

चायनीजमध्ये कम-जादाआल्याचा सर्वाधिक वापर चायनीज, मोमो, वडापाव यांसारख्या स्टॉल्सवर होतो. त्यामुळे विक्रेते हे त्याचे प्रमाण कमी- जास्त करून पदार्थ बनवितात. जिभेवर रेंगाळलेल्या चवीसाठी थोडेफार नुकसान सोसावे लागते. कारण चवीसाठीच ग्राहक आमच्याकडे वळतात आणि जर अन्नपदार्थ बेचव झाले तर ग्राहक तुटू शकतो.

चहाला सोबत ‘फ्युजन’चीसध्या चहाला ‘मसाला टी’, ‘इलायची टी’ तसेच ‘तुलसी - जिंजर टी’ ‘लेमन टी’ सारखे पर्याय उपलब्ध करून देत आहोत. आल्यात औषधी गुणधर्म असल्याने उकाड्यातही चहाप्रेमींची आल्याच्या चहाची मागणी घटलेली नाही. मात्र, आम्ही किमती वाढवू शकत नाही, कारण  आमच्यासाठी ग्राहक हा महत्त्वाचा आहे. काहीजण गवती चहा टाकूनही चहाची मागणी करतात. मात्र, त्याची चव ही सहज अनेकांच्या लक्षात येत नाही. तुळस आणि आल्याचे कॉम्बिनेशन हे शरीरात इम्युनिटी बुस्टरचे काम करते. त्यानुसार आम्ही ग्राहकांना त्यांच्या आवडीचा चहा पुरवितो.- सतीश तोलानी, चहा विक्रेते

अन्य भाजीपालाही महागला!भाजी दर (प्रती किलो)आले    १६० ते २००कोबी    ६० फ्लॉवर    ८०फरसबी    १६०वांगे मोठे    ८०वांगे छोटे    ६०बटाटा        २४कांदे        २४मटार    १००तोंडली    ८०गवार    १००सुरण    ८०भेंडी    ८० टोमॅटो    ३० शिरली    ८०घोसाळी    ८०अरबी    १००भोपळी    ८०भोपळा    ६० पडवळ    ८०लिंबू (एक नग)  पाच ते आठ रुपये 

टॅग्स :महागाई