Join us

ईडीच्या समन्सनंतर संजय राऊत यांच्या पत्नीने ते पैसे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:08 AM

ईडीकड़ून चौकशीचा ससेमिरा कायमसमन्सनंतर संजय राऊत यांच्या पत्नीने ‘ते’ पैसे केले परतपीएमसी बँक घोटाळा प्रकरण : ईडीकडून ...

ईडीकड़ून चौकशीचा ससेमिरा कायम

समन्सनंतर संजय राऊत यांच्या पत्नीने ‘ते’ पैसे केले परत

पीएमसी बँक घोटाळा प्रकरण : ईडीकडून चौकशीचा ससेमिरा कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपये खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केले. पैसे परत केले तरी त्यांच्यामागे अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) चाैकशीचा ससेमिरा कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पीएमसी बँकेतील ४ हजार ३३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक झाली. त्यांनी वर्षा राऊत यांच्यासाेबत आर्थिक व्यवहार केल्याची माहिती समोर आली. या व्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले. ४ जानेवारी रोजी त्या चौकशीला हजर राहिल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास त्यांची चाैकशी केली.

यात, राऊतने गुन्ह्यातील रकमेतून एक कोटी साठ लाख रुपये पत्नी माधुरीला दिले. माधुरीने यातील ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना दिले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वर्षा राऊत आणि माधुरी राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनच्या भागीदार आहेत.

दरम्यान, आता वर्षा राऊत यांनी यातील ५५ लाख रुपये माधुरी राऊत यांना परत केले. संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ चित्रपटातून मिळालेल्या उत्पन्नातून हे पैसे परत केले आहेत. राऊत यांच्या नातलगाने ईडीकडे सादर कलेल्या कागदपत्रांत पैसे परत केल्याचीही कागदपत्रे असल्याचे समजते. मात्र, हे पैसे परत केले असले तरी, वर्षा राऊत यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.

.......................................