Join us

शेतकरी आंदोलनानंतर किसान सभेकडून संघटनेची बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 4:16 AM

शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नांवर १ ते १० जून दरम्यान विविध पद्धतीने आंदोलन केल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेने आता संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नांवर १ ते १० जून दरम्यान विविध पद्धतीने आंदोलन केल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेने आता संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी किसान सभेने बेलापूरमध्ये ८ व ९ जुलै रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. त्यात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी देशव्यापी १० कोटी सह्या मिळवण्यासाठीची व्यूहरचान आखण्यात येणार आहे.राज्यात १ जून रोजी ऐतिहासिक शेतकरी संपाला वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने समविचारी संघटनांच्या मदतीने १ जून ते १० जून दरम्यान शेतकºयांसाठी विविध पद्धतीने आंदोलने केली.मात्र ही आंदोलने अधिक तीव्र होण्यासाठी जोरदार संघर्षाबरोबरच संघटना बांधणीकडे गांभीर्यानेलक्ष देण्याचा निर्धार किसानसभेने केला आहे. त्यानुसारप्रत्येक जिल्ह्यात शेतकºयांना सभासद करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून आंदोलनाची धार अधिक तीव्र करता येईल.संघटनेच्या बांधणीसाठी दोन दिवस पार पडणाºया बैठकीत किसान सभेचे राज्य पदाधिकारी उपस्थित असतील. त्यात रविवारी, ८ जुलैला सायंकाळी ५ वाजता आणि सोमवारी, ९ जुलै रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत किसान सभेच्या राज्य कौन्सिलची महत्त्वाची बैठक होईल.या दोन्ही बैठका बेलापूरच्या कॉम्रेड बी. टी. रणदिवे भवन येथे होतील. बैठकीत ज्येष्ठ नेते कॉ. अशोक ढवळे, आमदार जे.पी. गावित, किसान सभेचे नेते किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले असे महत्त्वाचे शेतकरी नेते उपस्थित राहतील.