मुंबई : मंडपासाठी परवानगी मिळण्यात बराच विलंब लागत असल्याने हवालदिल झालेल्या मंडळांनी महापालिकेला साकडे घातले. याची दखल घेऊन पोलीस व वाहतूक पोलिसांची परवानगी मिळताच पालिका तत्काळ मंडप उभारण्यास मंजुरी देईल, अशी हमी उपायुक्त व गणेशोत्सवाचे समन्वयक आनंद वागराळकर यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळाच्या पदाधिकाºयांची धावपळ सुरू आहे.गणेशोत्सवाला काही दिवस उरले असताना अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. स्थानिक पोलीस तसेच वाहतूक पोलिसांकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे. निम्म्याहून अधिक मंडळे अद्यापही परवानगीची वाट पाहत आहेत. या मंडळांनी पालिकेकडे आपले गाºहाणे मांडून सहकार्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पालिकेने आपली अट शिथिल केली आहे.आतापर्यंत महापालिकेकडे १३१२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केला आहे. यापैकी ७४ अर्ज फेटाळण्यात आले असून ८५ मंडळांना परवानगी मिळाली आहे. मात्र स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांच्या परवानगीसाठी ११५३ मंडळांचे अर्ज खोळंबले आहेत. त्यामुळे पालिकेने ही प्रक्रिया जलद करण्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या विभाग कार्यालयांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
>सार्वजनिक मंडळांनी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, महापालिका आणि अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच या मंडळांच्या मंडपांना परवानगी मिळते.मंडपासाठी आलेले अर्ज १३१२परवानगी मिळालेली मंडळे ८५अर्ज फेटाळले ७४परवानगीच्या प्रतीक्षेत ११५३