‘’ते विधान ऐकताच शिवसेनेच्या खासदारांनी जॅकेट शिवायला टाकलीत’’ उद्धव ठाकरेंच्या कट्टर विरोधकाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:56 PM2020-06-20T14:56:49+5:302020-06-20T15:11:15+5:30

शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी या विधानावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

"After hearing that statement, Shiv Sena MPs will took sewed the jacket." - Nitesh Rane | ‘’ते विधान ऐकताच शिवसेनेच्या खासदारांनी जॅकेट शिवायला टाकलीत’’ उद्धव ठाकरेंच्या कट्टर विरोधकाचा टोला

‘’ते विधान ऐकताच शिवसेनेच्या खासदारांनी जॅकेट शिवायला टाकलीत’’ उद्धव ठाकरेंच्या कट्टर विरोधकाचा टोला

Next
ठळक मुद्देशिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार म्हणजे तुम्ही किंवा तुमचा मुलगाच पंतप्रधान बनणार ना?उगाच कालपासून सेनेच्या खासदारांनी जॅकेट शिवायला टाकली आहेतयेत्या काळात शिवसैनिकाला पंतप्रधानपदी बसवणार असल्याचा इरादा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता.

मुंबई - काल झालेल्या शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना येत्या काळात शिवसैनिकाला पंतप्रधानपदी बसवणार असल्याचा इरादा जाहीर केला होता. उद्धव ठाकरे यांचे हे विधान चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान, शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी या विधानावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘’मी काय बोलतो,शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार म्हणजे तुम्ही किंवा तुमचा मुलगाच पंतप्रधान बनणार ना? उगाच कालपासून सेनेच्या खासदारांनी जॅकेट शिवायला टाकली आहेत. वेड्यांची जत्रा !! असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी कालही शिवसेनेवर टीका केली होती. पहिल्यांदा मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा बसवा, पंतप्रधानपद तर लांबच राहिले, असे ट्विट  नितेश राणे यांनी केले होते.

उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याच्या निर्धारानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील भाष्य केले होते.. उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून आता पाहतो आहे. आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर हा देश झाला सावध, लष्कराकडे सोपवली मोठी जबाबदारी

भारत-चीनमधील तो करार, ज्यामुळे सीमेवर होत नाही गोळीबार....

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

Web Title: "After hearing that statement, Shiv Sena MPs will took sewed the jacket." - Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.