Join us

गोरेगावच्या घटनेनंतर पालिकेला जाग, उघड्या गटारांची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 5:43 PM

या पालिकेच्या ट्वीटवर अनेकांनी असंतोष व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. 

ठळक मुद्देट्विटर हॅण्डलद्वारे नागरिकांना शहरातील उघड्या ड्रेनेज लाईनसारख्या जागांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तात्काळ माहिती वॉर्ड कंट्रोल रूमला १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून द्यावी अशा आशयाचे ट्वीट पालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबई - गोरेगाव येथे आंबेडकर नगर परिसरात घडलेल्या घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेला जाग आली आहे. पालिकेने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलद्वारे नागरिकांना शहरातील उघड्या ड्रेनेज लाईनसारख्या जागांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

गोरेगावात ३ वर्षीय चिमुरडा उघड्या गटारात पडल्यानंतर गेले अनेक तास त्याला शोधण्याचे काम पालिकेचे ५० कर्मचारी हे एनडीआरएफच्या मदतीने करत आहेत. गोरेगाव येथे घडलेली ही घटना दुर्दैवी असून शोधकार्य सुरु आहे. स्थानिकांना आम्ही विनंती करतो की, परिसरात कुठेही उघड्या ड्रेनेज लाईनसारखी ठिकाणं आढळून आल्यास त्याची तात्काळ माहिती वॉर्ड कंट्रोल रूमला १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून द्यावी अशा आशयाचे ट्वीट पालिकेकडून करण्यात आले आहे. या पालिकेच्या ट्वीटवर अनेकांनी असंतोष व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. 

    

Video : गोरेगावात गटारात पडलेला चिमुरडा १५ तास उलटूनही बेपत्ता; शोधकार्य सुरूच 

टॅग्स :नगर पालिकाट्विटरमुंबई