अर्भकाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड
By admin | Published: June 16, 2014 02:58 AM2014-06-16T02:58:40+5:302014-06-16T02:58:40+5:30
रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतापलेल्या नातेवाइकांनी शनिवारी गोवंडी येथील एका खाजगी रुग्णालयाची तोडफोड करीत रुग्णालय बंद केले.
मुंबई : रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतापलेल्या नातेवाइकांनी शनिवारी गोवंडी येथील एका खाजगी रुग्णालयाची तोडफोड करीत रुग्णालय बंद केले.
गोवंडीत राहणारे असिफ बनू यांनी त्यांच्या पत्नीला गुरुवारी येथील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. शुक्रवारी त्यांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. मुलीची प्रकृती ठीक नसल्याने येथील एका डॉक्टरने तिला इंजेक्शन दिले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र सायंकाळी घरी जाताच या मुलीची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे असिफ यांनी या मुलीला त्यांच्या शेजारीच असलेल्या रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू असतानाच नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू हा डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळेच झाल्याचा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी केला. या रागातून त्यांनी काल रात्री या रुग्णालयाची तोडफोड केली. (प्रतिनिधी)