मुंबई : अधिवेशन संपल्यानंतर प्रधान सचिव किंवा परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती ओला-उबर व्यवस्थापन आणि संघ यांच्यात बैठक घेईल. बैठकीत ओला-उबर चालकांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. त्यानंतर शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेला ओला-उबर चालकांचा संप स्थगित करण्यात आला.ओला-उबर चालक गेल्या दोन दिवसांपासून संपावर होते. समितीच्या बैठकीत चालकांना योग्य न्याय न मिळाल्यास डिसेंबरमध्ये पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी सांगितले.पहिला संप १२ दिवसांचापहिला संप - मूळ भाडे वाढवावे, प्रतिकिलोमीटर दरांत वाढ करावी आणि ओला-उबर कंपन्यांनी आपले कमिशन कमी करावे, या आणि अन्य मागण्यांसाठी ओला-उबर प्रशासनाविरुद्ध संघाच्या नेतृत्वाखाली २२ आॅक्टोबरपासून ओला-उबर चालक, मालकांनी संप पुकारला.तब्बल १२ दिवसांनंतर दिवाळीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मध्यस्थीने संप स्थगित करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ओला-उबरचा संप स्थगित, सचिवांची समिती सोडवणार प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 5:11 AM