महापरिनिर्वाण दिनानंतर दादरचे शिवाजी पार्क चकाचक
By admin | Published: December 9, 2014 10:38 PM2014-12-09T22:38:42+5:302014-12-09T22:38:42+5:30
महापालिका प्रशासनाने 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत एका विशेष मोहिमेद्वारे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसराची संपूर्ण साफसफाई करत 2क्क् मेट्रिक टन कचरा संकलित करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावली.
Next
दादर : महापालिका प्रशासनाने 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत एका विशेष मोहिमेद्वारे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसराची संपूर्ण साफसफाई करत 2क्क् मेट्रिक टन कचरा संकलित करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावली.
6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 58 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातील विविध राज्यांतून येणा:या लाखो अनुयायांसाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात महानगरपालिकेतर्फे ठिकठिकाणी स्नानगृहे, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची तसेच शिवाजी पार्क मैदानात राहण्याची तात्पुरती व्यवस्था, एकंदरीत स्वच्छता आदी नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
घनकचरा व्यवस्थापन खात्यातील 65 अधिका:यांनी तसेच अशासकीय संस्थेच्या प्रत्येकी 545 सदस्यांनी तीन सत्रंत 4 दिवस संपूर्ण परिसराची साफसफाई करुन हा परिसर स्वच्छ केला आहे. या चार दिवसांत प्रतिदिन 791 कर्मचा:यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
राम गणोश गडकरी चौक, सेनाभवन, दादर रेल्वे स्थानक, केळुस्कर मार्ग (दक्षिण व उत्तर विभाग), गोखले मार्ग, एस. के. बोले मार्ग, टिळक पूल, रानडे मार्ग आदी ठिकाणी परिरक्षण खात्याच्या 1क्क् कर्मचा:यांनी अनुज्ञापन खात्याच्या सहकार्याने अभियंत्यांच्या उपस्थितीत पोस्टर्स, बॅनर्स काढण्याची कारवाई पूर्ण केली आहे. (प्रतिनिधी)