बगदादीच्या मृत्यूच्या बातमीनंतर पोलीस दक्ष
By admin | Published: November 11, 2014 02:00 AM2014-11-11T02:00:54+5:302014-11-11T02:00:54+5:30
इराक आणि सीरियातील संघर्षात गुंतलेल्या इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल बगदादी अमेरिकी हवाई हल्ल्यात मारला
Next
डिप्पी वांकाणी ल्ल मुंबई
इराक आणि सीरियातील संघर्षात गुंतलेल्या इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल बगदादी अमेरिकी हवाई हल्ल्यात मारला गेल्याचा अंदाज वर्तविणा:या बातम्यांनंतर महाराष्ट्र पोलिसांचे विशेष पथक आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) इंटरनेटवरील मजकुरावर खास लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
बगदादीच्या मृत्यूसंबंधी पोस्ट अपलोड करून दहशतवादी संघटना भारतातून उमेदवार भरतीसाठी तरुणांना भावनिक आवाहन करू शकतात. त्यामुळे असा संशयास्पद मजकूर अपलोड करणा:यांवर पोलीस यंत्रणा नजर ठेवत असल्याचे एटीएसचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी सांगितले. एटीएसने अनिस अन्सारी या 24 वर्षाच्या तंत्रज्ञाला शहरातील अमेरिकी संस्थांवर हल्ला करण्याच्या कटाबद्दल अटक केली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी कल्याण येथून बेपत्ता झालेले चार तरुण इराकमध्ये आयएसआयएसच्या लढय़ात सामील झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यासाठीही सोशल नेटवर्किग साइट्सचा वापर केला गेला होता. त्यातील एक जण तेथे मारला गेल्यानंतर त्याची छायाचित्रे इंटरनेटवरून प्रसारित करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला होता, असे एका अधिका:याने सांगितले. मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता संकलनासाठी असलेल्या विशेष विभागातील उपायुक्त संजय शिंत्रे यांनीही पोलीस अहोरात्र इंटरनेटवर नजर ठेवत असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
या संघटनेशी संबंधित मजकूर इंटरनेटवर अपलोड करणा:यांवर पोलीस नजर ठेवत आहेत. मात्र आजवर पोलीस यंत्रणांना भारतीय तरुणांना या संघटनेत सामील होण्यापासून रोखण्यात किंवा येथील तरुणांना भडकवणा:यांना पकडण्यात यश आलेले नाही.