राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंचंही आवाहन, फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 10:00 PM2021-06-11T22:00:23+5:302021-06-11T22:00:31+5:30
राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात.
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे. येत्या १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानंतर, आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते असून राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे, त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह असतो.
राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंच्या वाढदिनीही मातोश्रीवर शुभेच्छांसाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळेच, काका आणि पुतण्या दोघांनीही वाढदिवसानिमित्त चाहत्यांना, कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंचा 13 जून रोजी वाढदिवस असतो.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 11, 2021
मागील वर्षापासून आपण कोरोनाशी लढत आहोत, आता तिसऱ्या लाटेसाठीही आपल्याला सज्ज व्हायचे आहे. त्यामुळचे, माझ्या वाढदिवसानिमित्त यंदा कार्यक्रम, सोहळे, सत्कार मी टाळत आहे. माझ्या वाढदिवसासाठी होर्डिंग्ज, हार, केक यासाठी खर्च न करु नका. शक्य ते नियम पाळावे आणि इतरांना मदत करावी, हीच माझ्या वाढदिवसाला अमूल्य भेट आहे, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी ट्विटरद्वारे केले आहे.
राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो... माझ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना नम्र आवाहन!#महाराष्ट्रसैनिक#लढाकोरोनाशी#MaharashtraFightsCoronapic.twitter.com/aCx1f4m3uW
— Raj Thackeray (@RajThackeray) June 11, 2021