Join us

विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची पुन्हा हजेरी, सखल भागांमध्ये साचलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 11:28 AM

मुंबई -  मागील काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांतीवर असलेल्या पावसाने पुन्हा एकदा रिमझिम सुरु केली आहे. शुक्रवारी पहाटे शहरात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या असून पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. विशेषतः पावसाने मारलेली दडी आणि वाढलेली आर्द्रता; या दोन्ही कारणामुळे मुंबईच्या वातावरणात बदल झाले आणि मुंबई घामाघूम झाली. मात्र गुरुवारी रात्रीपासून वातावरणात बदलाची नोंद होत असून रात्रीपासूनच वरळी, करिरोड, परेल, वांद्रे-कुर्ला संकुल, सायन, कुर्ला आणि घाटकोपर परिसरात पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी यात आणखी भर पडली असून मुंबईवर ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाची नोंद कमी झाली असली तर ढगाळ वातावरण कायम आहे. दरम्यान पुढील ४८ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.