पुनर्विवाहानंतरही निवृत्तीवेतन कायम
By admin | Published: February 10, 2015 12:17 AM2015-02-10T00:17:31+5:302015-02-10T00:17:31+5:30
पुनर्विवाहानंतरही मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या विधवांना कुटुंब निवृत्तीवेतन लागू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला
Next
मुंबई : पुनर्विवाहानंतरही मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या विधवांना कुटुंब निवृत्तीवेतन लागू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. महाराष्ट्र नागरी सेवेच्या निवृत्तीवेतनासंबंधीच्या नियमानुसार मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या विधवांना पुनर्विवाहानंतर निवृत्तीवेतन मिळत नसे. आता या नियमात सुधारणा करीत पुनर्विवाह केल्यानंतर सुद्धा मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या विधवांना निवृत्तीवेतन लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय आता मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्या मान्यतेनंतर याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येईल. (प्रतिनिधी)