Join us

शरद पवारांनंतर मुख्यमंत्र्यांचाही नाना पटोलेंना टोला, स्वबळावरुन मिश्कील टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 9:59 AM

नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. त्यामुळे, शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.

ठळक मुद्देनानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. त्यामुळे, शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसवर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नाना पटोलेंवर बोचरी टीका करत, लहान माणसांबद्दल मी काय बोलणार असे म्हटले. त्यामुळे, पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचा आरोप भाजपाने केला. त्यातच, पटोलेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर पाळत ठेवत असल्याचं गंभीर आरोप केला होता. आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही नाना पटोलेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. 

नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. त्यामुळे, शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनंही नाना पटोलेंना लहान म्हटलंय. तर, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जलभूषण पुरस्कार सन्मान सोहळ्यावेळी बोलताना नाना पटोलेंना लक्ष्य केले. 

'बाळासाहेब थोरात यांनी करोनाची भीती न बाळगता आम्हाला जेवण्यासाठी बोलवावं, आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असा टोला लगावला उद्धव ठाकरेंनी लगावला. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका नाहीतर उद्या जेवणावरुन आघाडीत बिघाडी असं व्हायचं, पण तसं काही नाही,' असं स्पष्टीकरणही ठाकरेंनी दिलं.  माझी आतापर्यंतची राजकीय कारकिर्द काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधातील आहे. जे काही कानावर पडलं ते राजकीय मतभिन्नतेचं पडलं होतं. पण, याचा अर्थ आम्ही विरोधक होतो म्हणजे तुम्ही केलं ते सगळं वाईट असं नाही. शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची अशी भूमिका कधीच नव्हती, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीत बिघाडी नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, स्वबळाची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंना टोलाही लगावला. 

शिवसेनेला दे धक्का, अशोक शिंदे काँग्रेसमध्ये

शिवसेनेचे उपनेते आणि युती काळातील राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. वर्धाच्या हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं आहे. दिल्लीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशोक शिंदे यांच्यासोबत ठाणे, भिवंडी येथील सुरेश म्हात्रे यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. सुरेश म्हात्रे यांनी याआधीच शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसणार आहे.  

टॅग्स :नाना पटोलेशिवसेनाउद्धव ठाकरेकाँग्रेस