समन्सनंतर संजय राऊत यांच्या पत्नीने ‘ते’ पैसे केले परत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 05:20 AM2021-01-16T05:20:58+5:302021-01-16T05:21:17+5:30

पीएमसी बँक घोटाळा 

After the summons, Sanjay Raut's wife returned the money | समन्सनंतर संजय राऊत यांच्या पत्नीने ‘ते’ पैसे केले परत

समन्सनंतर संजय राऊत यांच्या पत्नीने ‘ते’ पैसे केले परत

googlenewsNext

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपये खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केले. पैसे परत केले तरी त्यांच्यामागे अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) चाैकशीचा ससेमिरा कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पीएमसी बँकेतील ४ हजार ३३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक झाली. त्यांनी वर्षा राऊत यांच्यासाेबत आर्थिक व्यवहार केल्याची माहिती समोर आली. या व्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले. ४ जानेवारी रोजी त्या चौकशीला हजर राहिल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास त्यांची चाैकशी केली.
यात, राऊतने गुन्ह्यातील रकमेतून एक कोटी साठ लाख रुपये पत्नी माधुरीला दिले. माधुरीने यातील ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना दिले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वर्षा राऊत आणि माधुरी राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनच्या भागीदार आहेत. 

पुन्हा हाेणार चाैकशी!
nवर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्याकडून घेतलेले ५५ लाख रुपये माधुरी यांना परत केले आहेत. संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ चित्रपटातून मिळालेल्या उत्पन्नातून हे पैसे परत करण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. 
nवर्षा राऊत यांच्या नातलगाने ईडीकडे सादर कलेल्या कागदपत्रांत पैसे परत केल्याचीही कागदपत्रे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, त्यांनी हे पैसे परत केले असले तरी, वर्षा राऊत यांना ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. 

Web Title: After the summons, Sanjay Raut's wife returned the money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.