कारवाईनंतरही रेतीमाफिया मोकाटच

By admin | Published: October 3, 2015 02:12 AM2015-10-03T02:12:15+5:302015-10-03T02:12:15+5:30

रेतीचे उत्खनन करण्यासाठी व अनधिकृत भराव टाकण्यासाठी खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर उत्खनन केले

After taking action, Rati mafia Mokatch | कारवाईनंतरही रेतीमाफिया मोकाटच

कारवाईनंतरही रेतीमाफिया मोकाटच

Next

सुरेश लोखंडे, ठाणे
रेतीचे उत्खनन करण्यासाठी व अनधिकृत भराव टाकण्यासाठी खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर उत्खनन केलेली रेती हस्तगत केली. परंतु, या खाडीकिनाऱ्याचेकांदळवन नष्ट करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते की नाही, याबाबत मात्र साशंकता व्यक्त होत आहे.
आजपर्यंतचा इतिहास पाहता खाडीकिनारी रेती, ट्रक, डम्पर, सक्शन पंप जप्त केले जातात. आरोपी मात्र फरार होतात. त्यांचा शोध लागतच नसल्याने सर्वसामान्यांत अशा कारवाईबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.
त्सुनामीपासून बचाव करणाऱ्या खारफुटीच्या कांदळवनाचे संरक्षण करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही जिल्ह्यातील ठाणे खाडीसह घोडबंदर, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, भार्इंदर खाडीतील कांदळवन जाळून नष्ट केले जात आहे. याशिवाय, दिवागाव परिसरातील खाडीकिनाऱ्याच्या कांदळवनावर मोठ्या प्रमाणात भराव घालून त्या झुडुपांना दाबले जात आहे. तर, काही ठिकाणी खारफुटीच्या मोठमोठ्या झाडांच्या बुंध्यांखाली केमिकल्स टाकून झाडे वाळविली जात आहेत.

Web Title: After taking action, Rati mafia Mokatch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.