मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कर्मचारी संप मागे घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 05:26 AM2018-08-05T05:26:46+5:302018-08-05T05:26:57+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या बैठकीत मिळालेल्या ठोस आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तीन दिवसांचा संप मागे घेतला जाण्याची शक्यता असून त्याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी केली जाणार आहे.

After the talks with the CM, will the employee withdraw the strike? | मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कर्मचारी संप मागे घेणार?

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कर्मचारी संप मागे घेणार?

googlenewsNext

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या बैठकीत मिळालेल्या ठोस आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तीन दिवसांचा संप मागे घेतला जाण्याची शक्यता असून त्याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी केली जाणार आहे.
कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्यांबाबत शासन गांभीर्याने विचार करेल, असे सांगताना सातवा वेतन आयोग आणि महागाई भत्त्याची थकबाकी याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संप मागे घेण्याचे आवाहन केले.
सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आता संप मागे घेतला जाण्याची
शक्यता आहे. सोमवारच्या संयुक्त बैठकीनंतर त्याची घोषणा केली जाईल.
शनिवारच्या बैठकीला मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यूपीएस मदान आणि वरिष्ठ अधिकारी तसेच राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी व
शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
>महागाई भत्त्याची थकबाकी अन् वेतन आयोग देणार
१४ महिन्यांच्या थकीत महागाई भत्त्यासह सातव्या वेतन आयोगाचा लाभ जानेवारी २०१९ पासून देणार. वेतन आयोग आधी मान्य केल्याप्रमाणे जानेवारी २०१६ पासूनच देणार.
या दोन्ही बाबींसाठी ४ हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद करणार.
पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत शक्य तितक्या लवकर निर्णय घेणार.
चतुर्थश्रेणी कर्मचारी व शिक्षकांच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेणार.
नवीन अंशदायी निवृत्तिवेतन योजनेत सुधारणेसाठी अभ्यासगट स्थापण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: After the talks with the CM, will the employee withdraw the strike?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.