"वरुण सरदेसाई म्हणाले, गुगलवर खंडणी टाका सगळं कळेल; आम्ही ते टाकून बघितलं अन्..."

By मुकेश चव्हाण | Published: January 30, 2021 12:52 PM2021-01-30T12:52:22+5:302021-01-30T12:53:10+5:30

 वरुण सरदेसाई यांच्या या ट्विटनंतर आता पुन्हा संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

After this tweet of Shiv Sena leader Varun Sardesai, MNS leader Sandeep Deshpande has replied to him by tweet | "वरुण सरदेसाई म्हणाले, गुगलवर खंडणी टाका सगळं कळेल; आम्ही ते टाकून बघितलं अन्..."

"वरुण सरदेसाई म्हणाले, गुगलवर खंडणी टाका सगळं कळेल; आम्ही ते टाकून बघितलं अन्..."

Next

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय टिकाटिप्पणीला सुरुवात झालीय. मुंबई महापालिकेतल्या कारभारावरुन अनेक वेळा शिवसेनेला डिवचणाऱ्या मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी ट्विट करत शिवसेनेवर निशाण साधला होता.

मुंबई महापालिकेत विरप्पन गँग काम करत आहे. ही विरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल,असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. संदीप देशपांडे यांच्या टीकेला शिवसेनेच्या युवासेनेचे सचिन वरुण सरदेसाई यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. 

खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्यालाही माहित करुन घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त google search करुन बघावे. Google च्या पहिल्याच पेजवर या बातम्या सापडतील. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत, पण प्रत्येक जिल्हातील यांची स्टोरी सेम टू सेम आहे” असं ट्विट वरुण सरदेसाईंनी केलं. सरदेसाईंनी ट्विटमध्ये काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले होते.

 वरुण सरदेसाई यांच्या या ट्विटनंतर आता पुन्हा संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. वरुण सरदेसाई म्हणाले, गुगल वर खंडणी टाका सगळ कळेल, आम्ही टाकून बघितलं असं म्हणत गुगल सब जानता है, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसेमध्ये ट्विटरर चांगलचं रंगणार असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा किंवा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन, असा निर्धारही संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

शिवसेनेने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबावर केली जाहीर टीका-

 मुंबईत वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये शुक्रवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत मनसेप्रमुखराज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी देखील राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली मनसेची एक महत्वाची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली ठाकरे देखील उपस्थित राहिल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली होती.

शिवसेनेने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबावर केली जाहीर टीका; वाद चिघळण्याची शक्यता

याचपार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे. शॅडो' चे पण 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी', असं ट्विट करत वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: After this tweet of Shiv Sena leader Varun Sardesai, MNS leader Sandeep Deshpande has replied to him by tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.