Join us

अडीच महिन्यांनंतर अनेक राज्यांत आज उघडणार टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 6:26 AM

अनलॉकला प्रारंभ : कार्यालये, हॉटेल्स, मॉल सुरू

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे अडीच महिने बंद असलेली देशाच्या अनेक राज्यांतील उपाहारगृहे, हॉटेल्स, मॉल, मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे सोमवारपासून सुरू होणार आहेत. परंतु या ठिकाणी तेथे संसर्ग वाढू नये म्हणून सर्वांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परंतु लोकल गाड्या, शाळा, महाविद्यालये आणि सर्व चित्रपटगृहे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहेत. या सर्व ठिकाणी प्रवेशद्वारापाशी ‘हँड सॅनिटायझर’ ठेवणे, योग्य अंतर ठेवून लोकांनी रांग कुठे लावावी याच्या खुणा आखणे व ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींनाच प्रवेश देणे ही बंधने पाळावी लागतील.उपाहारगृहे व हॉटेल : ग्राहकांना तेथे बसून खाण्याऐवजी शक्यतो ‘पार्सल’ सेवा द्यावी. तेथे खाणाऱ्यांना पाहून/वापरून झाले की फेकून देता येईल असे मेन्युकार्ड व नॅपकिन द्यावे. स्पर्र्शविरहित चेक-इन व चेक-आऊटची सोय. गेस्टचे जास्तीचे सामान लॉकरूममध्ये ठेवण्याआधी निर्जंतुकीकरण करावे. कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी शक्यतो मोबाईल किंवा इंटरकॉमवरच बोलावे.मंदिरे व प्रार्थनास्थळे : येताना पादत्राणे वाहनातच काढून ठेवावी. आत येण्यापूर्वी प्रत्येकाने हात-पाय धुणे बंधनकारक. देवाच्या मूर्तीला स्पर्श करण्यास बंदी. तीर्थ-प्रसाद वाटण्यास व जल शिंपडण्यास मनाई. प्रत्येकाने बसण्यासाठी सतरंजी वा आसन आणावे. एकत्र जमून भजने, आरत्या म्हणण्यास मनाई असेल. त्याऐवजी भक्तिगीतांच्या रेकॉर्ड लावाव्यात.शॉपिंग मॉल : मॉलमधील एसीचे तापमान २४ ते ३० अंश व हवेची आर्द्रता ४० ते ७० टक्के असावी. मॉलमधील चित्रपटगृहे बंद राहतील. बाहेर मुलांसाठी खेळण्याची साधने असल्यास तीही बंद ठेवावीत. ग्राहकांनी आतमध्ये फिरताना व पैसे देण्याच्या रांगेत किमान तीन फुटांचे अंतर ठेवावे. पसंत केलेले कपडे मापाचे आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी ‘ट्रायल रूम’मध्ये ते घालून बघण्यास मनाई असेल.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रलॉकडाऊन अनलॉक