महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यानंतर खडडे बुजविण्याच्या कामाला वेग, एका दिवसात बुजविले ८५६ खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 03:22 PM2020-08-20T15:22:47+5:302020-08-20T15:23:21+5:30

येत्या दोन दिवसावर आलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने आता शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्ती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ११२२ पैकी ८५६ खड्डे पालिकेने आता एका दिवसात बुजविले आहेत. तर उर्वरीत ३२० खड्डे दोन दिवसात बुजविण्याचा दावा केला आहे.

After the visit of the Municipal Commissioner, the work of filling the pits was speeded up, 856 pits were filled in one day. | महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यानंतर खडडे बुजविण्याच्या कामाला वेग, एका दिवसात बुजविले ८५६ खड्डे

महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यानंतर खडडे बुजविण्याच्या कामाला वेग, एका दिवसात बुजविले ८५६ खड्डे

Next

ठाणे : मागील काही दिवसापासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवरुन महापालिकेवर चांगलीच टिकेची झोड उठली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी सकाळी रस्त्यांची पाहणी करून तातडीने खड्डे भरण्याचे आदेश दिल्यानंतर दुपारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आल्याचे दिसून आले. त्यानुसार अवघ्या एका दिवसात शहरातील विविध भागात रस्त्यांना पडलेल्या ११२२ पैकी ८५६ खडडे पालिकेच्या माध्यमातून बुजविण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.
               महापालिका आयुक्तांनी पाहणी दौºयाच्यावेळी खड्डे बुजविण्याचे काम सुरू न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्या पाशर््वभूमीवर बुधवारी दुपारपासूनच खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे. यामध्ये बुधवारी तीन हात नाका, नितीन कंपनी ते लुईस वाडी सर्व्हीस रोड, दालमिल नाका, एम्को कंपनी, माजीवडा नाका, तीन हात फ्लाय ओवर ब्रीज, वागळे प्रभाग समितीतंर्गत कशीश पार्क या ठिकाणचे रस्ते युद्ध पातळीवर बुजविण्यात आले. नगर अभियंता रविंद्र खडताळे यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान खड्डे बुजविण्याची ही मोहिम सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असून त्यामध्ये हयगय झाल्यास कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील खड्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. ९ प्रभाग समिती अंतर्गत ११२२ खड्डे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे एकूण क्षेत्रफळ हे २३४५.८५ चौरस मीटरचे होते. त्यातील १४८२.४३ चौरस मीटर क्षेत्रफळाचे ८५६ खड्डे बुजविण्यात आले असून उर्वरीत ८६३.४२ चौरस मीटर क्षेत्रफळाचे ३२० खड्डे दोन दिवसात बुजविले जातील असा दावा पालिकेने केला आहे. हे खड्डे डब्ल्युबीएम, कोल्डमिक्स, पेव्हरब्लॉक, कॉंक्रीटीकरणाद्वारे, डांबरीकरणाद्वारे बुजविण्याचे काम सुरु आहे.
सर्वाधीक खड्डे दिव्यात
दिव्यात भाजपच्या वतीने खड्डे दाखवा आणि ११ हजारांचे बक्षीस मिळावा असे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. आता महापालिकेने देखील दिवा भागात सर्वाधीक खड्डे असल्याचे जाहीर केले आहे. आजच्या घडीला दिव्यात ३६१ खड्डे असून त्यातील १९४ खड्डे भरण्यात आले आहेत. त्या खोलाखाल नौपाडा - कोपरी भागात २२० खड्डे असून त्या भागातील १७२ खड्डे भरले आहेत. तर, वागळेमध्ये ११६ खड्डे आहेत. वर्तकनगर ९८, मुंब्रा ८५, लोकमान्य सावरकरनगर ६९, उथळसर ४०, कळवा ३५ आहेत.

 

Web Title: After the visit of the Municipal Commissioner, the work of filling the pits was speeded up, 856 pits were filled in one day.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.