रेल्वेवर पुन्हा हल्ल्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:36 AM2019-03-02T05:36:31+5:302019-03-02T05:36:34+5:30

सतर्क राहा : पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्त, महानिरीक्षकांचे पत्र

Again the fear of attack on the train | रेल्वेवर पुन्हा हल्ल्याची भीती

रेल्वेवर पुन्हा हल्ल्याची भीती

Next

मुंबई : पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट जाहीर केला आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला रेल्वेवर होण्याची शक्यता वर्तविली आहे. या संदर्भातील पत्र मुंबई, अहमदाबाद, रतलाम, बडोदा, राजकोट आणि भावनगर रेल्वे सुरक्षा दलाच्या आयुक्तांना पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्त, महानिरीक्षकांनी पाठविले आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आमची गुरुवारीच सुरक्षेसंदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली असून, आम्ही रेल्वे स्टेशन्सवर हाय अलर्ट जारी केले आहे.


पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या फॅक्सनुसार १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दहशतावादी हल्ला होण्याची भीती आहे. इतिहासातील सर्वात मोठा बॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. हा हल्ला रेल्वे स्टेशन, मंदिरे या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला जाऊ शकतो, तसेच गुजरातमधील काही सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्टेशन, स्टॅचू आॅफ युनिटी उद्ध्वस्त करण्यासाठी साखळी बॉम्बस्फोट घडविले जाऊ शकतात, असे या पत्रात म्हटले आहे.

‘जम्मू-काश्मीरकडून येणाºया मेल-एक्स्प्रेसवर लक्ष द्या’
पत्रात नमूद केल्यानुसार मोहम्मद इब्राहिम नावाच्या ग्रेडर हैदराबादच्या व्यक्तीसोबत रेहान नावाचा सुसाइड बॉम्बर आणि एक वयस्कर महिला आहे. मोहम्मद इब्राहिम हा पुलवामा हल्ल्याशी संबंधित असून, हे तिघेही मसूद अझरच्या दहशतवादी गटाशी संबंधित आहेत. या दहशतवाद्यांच्या रडारवर रेल्वे स्थानके आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व स्टेशन आणि रेल्वेवर कडक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. विशेषत: दिल्ली, जम्मू काश्मीरहून येणाºया मेल-एक्स्प्रेसवर जास्त लक्ष द्या, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ : रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविलेली आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्यासोबत भारतीय सेनेचा फौजफाटा रेल्वे स्थानकावर चौकस नजरेने पहारा देत आहे. अतिदक्षतेची परिस्थिती असल्याने, प्रत्येक ठिकाणांची तपासणी श्वान पथकाद्वारे केली जात आहे. सर्वच रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरीवली आणि मध्य रेल्वे स्थानकावरील सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण या स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबा घेत असल्याने, येथे जादा सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. रेल्वे बोर्डाच्या सूचनेप्रमाणे जम्मू-काश्मीर, दिल्ली येथून येणाºया लांब पल्ल्यांच्या गाड्याची तपासणी वाढविली आहे. रेल्वे स्थानक वाहनतळ, शौचालय, प्रथम दर्जा डब्बा, माल डब्बा येथे सेगवे वाहन, हॅडल मेटल डिटेक्टर श्वानपथक यांच्या साहाय्याने प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.

मुंबईतील फेरीवाल्यांची तपासणी
च्मुंबई : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रमुख बाजारपेठा तसेच रस्ते, रेल्वे परिसरालगत असलेल्या फेरीवाल्यांचीही मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. रस्त्यांवर अडथळा ठरणाºया फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हेदेखील दाखल करण्यात येत आहेत.
च्मुंबई पोलिसांनी रस्त्यांवरील फेरीवाल्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. रस्त्यांवर अडथळा ठरत, ज्वलनशील वस्तूंचा वापर करून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत गस्त वाढवण्यात आली आहे. मुंबईतील सीसीटीव्हींच्या मदतीने पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Again the fear of attack on the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.