पुन्हा एकदा जुन्या कंपनीला कंत्राट; आॅनलाइन प्रवेशात गोंधळ होणार?
By admin | Published: May 30, 2017 06:45 AM2017-05-30T06:45:16+5:302017-05-30T06:45:16+5:30
मुंबई विद्यापीठामध्ये आता आॅनलाईन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी केली जात आहे. पण, आॅनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठामध्ये आता आॅनलाईन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी केली जात आहे. पण, आॅनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यासाठी निविदा प्रक्रिया न राबविता पुन्हा एकदा जुन्या कंपनीला कंत्राट दिल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.
गेल्यावर्षीच्या आॅनलाईन प्रवेशासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी अत्यल्प प्रतिसाद विद्यापीठाला मिळाला होता. फक्त तीन कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर एक्झॉन कंपनीला एका वर्षासाठी कंत्राट दिले होते. हे कंत्राट संपल्यावर निविदा प्रक्रिया न राबविता जुन्या कंपनीला पुन्हा कंत्राट देण्यात आले.
मुंबई विद्यापीठाचे आॅनलाईन प्रवेश देण्यासाठी एमकेसीएल या कंपनीला आधी कंत्राट देण्यात आले होते. पण, या कंपनीकडे कंत्राट असताना प्रवेश प्रक्रियेत अनेक गोंधळ उडाले होते. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून गेल्यावर्षी एका वेगळ््या कंपनीला प्रवेशांचे कंत्राट देण्यात आले होते. पण, एका वर्षातच या कंपनीचे कंत्राट काढून घेण्यात आले आहे.
गेल्या सहा ते सात वर्षांपासून ही कंपनी आॅनलाईन प्रवेश, हॉलतिकीट याविषयीचे काम पाहत होती. त्यावेळी अनेकदा हॉल तिकीटामध्ये चुका होणे, संकेतस्थळ न उघडणे, माहिती सबमिट न होणे अशा अडचणी येत होत्या. त्यामुळे कंपनीला बदलण्यात आले होते. पण, आता पुन्हा त्याच कंपनीला कंत्राट मिळाल्याने पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.