नवी मुंबई : अतिक्रमणाच्या विरोधात सिडकोने आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी मुंबईसह उरण आणि पनवेल तालुक्यातील पाच हजार बांधकामांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई होणार असल्याची माहिती सिडकोचे मुख्य प्रशासक (नवीन शहरे) सुनील केंद्रेकर यांनी दिली.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची अतिरिक्त जबाबदारी केंद्रेकर यांच्यावर सोपविली आहे. त्यानुसार केंद्रेकर यांनी आज पत्रकार परिषद घेवून अनधिकृत बांधकामांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. अनधिकृत बांधकामांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. हलगर्जी करणा:या संबंधित अधिका:यांवरही कारवाई करण्यात येईल, असे केंद्रेकर यांनी स्पष्ट केले आहे. कारवाई करण्यापूर्वी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबर 2012 पूर्वीच्या बांधकामांवर तूर्तास कारवाई केली जाणार नाही. मात्र त्यानंतर उभारण्यात आलेल्या एकाही बांधकामाची गय केली जाणार नाही. सुरुवातीला अतिक्रमण झालेले सिडकोचे भूखंड मोकळे केले जाणार आहेत. महापालिका आणि पोलीस यंत्रणोबरोबर वेळोवेळी समन्वय साधण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले.
चाळीस बडय़ा बांधकामांवर हातोडा
आता एकही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही,
हा संदेश रुजविण्यासाठी पहिल्या टप्प्यात नयना आणि सिडको नोडल क्षेत्रतील प्रत्येकी 20 याप्रमाणो चाळीस बांधकामांवर बुलडोझर फिरविण्यात येणार आहे.
ही सर्व बांधकामे समाजातील काही प्रतिष्ठित
मंडळींची आहेत.
अतिक्रमण विभाग व्हॉट्सअॅपवर
अतिक्रमणांची माहिती देण्यासाठी सिडकोने व्हॉट्सअॅपचा वापर करण्याचे ठरविले आहे. 8767753114 हा अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचा मोबाइल क्रमांक आहे. तक्रारी या क्रमांकावर पोस्ट कराव्यात, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी केले आहे.