Join us

आगरी-कोळी- ईस्ट इंडियन बांधवांनी न्याय अन् हक्कासाठी उभारली एकी संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 3:13 PM

स्थानिक भूमिपुत्र म्हणून या समाज बांधवांना प्राथमिक अधिकार असून अनेक राजकीय पक्ष व प्रशासन - सरकार यांनी या भूमिपूत्रांना दूर ठेवूले आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- एकी  म्हणजेच संघटीत होऊन लढा उठवणे वा एकत्र येऊन समाज क्रांती घडविणे. मुंबई व उपनगर एमएमआरडीए मधील स्थानिक भूमिपूत्र कोळी, आगरी व ईस्ट इंडियन बांधवांनी एकत्र येत आपल्या स्थानिक हक्कासाठी आवाज उठवत बांद्रा येथे सामाजिक व राजकीय एकी असलेल्या एकी संघटनेची नुकतीच स्थापना केली.

स्थानिक भूमिपुत्र समाजातून ज्येष्ठ समाज सुधारक व स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब राऊत, बाबासाहेब वरळीकर, काका बाप्टिस्टा, नारायण नागू पाटील इत्यादी मान्यवरांची प्रेरणा घेऊन ही संघर्ष सामाजिक व राजकीय  चळवळ उभी राहिली आहे. आपला गांव! आपले राज्य! अश्या घोषणा देत, एकी करीता मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या विभागातील सर्व कोळी, आगरी, ईस्ट इंडियन ख्रिस्ती भूमिपुत्र बांधव एक स्थानिक म्हणून आपल्या मूलभूत हक्क - न्याय व अधिकारासाठी एकत्र आले आहेत.

स्थानिक भूमिपुत्र म्हणून या समाज बांधवांना प्राथमिक अधिकार असून अनेक राजकीय पक्ष व प्रशासन - सरकार यांनी या भूमिपूत्रांना दूर ठेवूले आहे. त्यामुळे कोळी, आगरी, ईस्ट इंडियन समाज अंतर्गत पोट जाती यांनी आपल्या न्याय व हक्कांसाठी एकत्र येऊन लढा उभारण्यच्या हेतूने सांताक्रूझ पूर्व,वाकोला येथील मोबाय गावठण पंचायतच्या पुढाकाराने सर्व स्थानिक भूमिपूत्र म्हणजे कोळी, आगरी, ईस्ट इंडियन यांची नुकतीच  संयुक्त बैठक झाली.यावेळी आगरी समाजाचे सागर पाटील, निलेश पाटील,कोळी समाजाचे मोहित रामले, भावेश वैती,अभिषेक वैती तर ईस्ट इंडियन समाजाचे नील परेरा, ब्रिस रोड्रिक्स या तरुणांनी एकत्र येत  एकी संघटनेची स्थापना केली.

अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघटना यांनी देखील स्थानिक भूमिपुत्र कोळी म्हणून एकीला पाठिंबा दर्शवला असू विविध कोळीवाड्यात कोळी बांधव व इतर कोळी संघटना यांच्याशी चर्चा करून आगामी पालिका निवडणूकीत कोळी समाजातील हक्काचे उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा  करण्यात येणार आहे अशी माहिती मोहित रामले यांनी दिली.

टॅग्स :मुंबई