आगरी - कोळी - ईस्ट इंडियन बांधवांनी न्याय, हक्कासाठी उभारली एकी संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:10 AM2021-09-08T04:10:47+5:302021-09-08T04:10:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई- एकी म्हणजेच संघटित होऊन लढा उठवणे वा एकत्र येऊन समाजक्रांती घडविणे. मुंबई व उपनगर ...

Agari-Koli-East Indian Brothers formed an organization for justice and rights | आगरी - कोळी - ईस्ट इंडियन बांधवांनी न्याय, हक्कासाठी उभारली एकी संघटना

आगरी - कोळी - ईस्ट इंडियन बांधवांनी न्याय, हक्कासाठी उभारली एकी संघटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई- एकी म्हणजेच संघटित होऊन लढा उठवणे वा एकत्र येऊन समाजक्रांती घडविणे. मुंबई व उपनगर एमएमआरडीएमधील स्थानिक भूमिपुत्र कोळी, आगरी व ईस्ट इंडियन बांधवांनी एकत्र येत आपल्या स्थानिक हक्कांसाठी आवाज उठवत वांद्रे येथे सामाजिक व राजकीय एकी असलेल्या एकी संघटनेची नुकतीच स्थापना केली.

स्थानिक भूमिपुत्र समाजातून ज्येष्ठ समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब राऊत, बाबासाहेब वरळीकर, काका बाप्टिस्टा, नारायण नागू पाटील, इत्यादी मान्यवरांची प्रेरणा घेऊन ही संघर्ष सामाजिक व राजकीय चळवळ उभी राहिली आहे.

आपला गाव! आपले राज्य! अशा घोषणा देत, एकीकरिता मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या विभागांतील सर्व कोळी, आगरी, ईस्ट इंडियन ख्रिस्ती भूमिपुत्र बांधव एक स्थानिक म्हणून आपल्या मूलभूत हक्क - न्याय व अधिकारासाठी एकत्र आले आहेत.

स्थानिक भूमिपुत्र म्हणून या समाजबांधवांना प्राथमिक अधिकार असून अनेक राजकीय पक्ष व प्रशासन-सरकार यांनी या भूमिपुत्रांना दूर ठेवले आहे. त्यामुळे कोळी, आगरी, ईस्ट इंडियन समाजअंतर्गत पोटजाती यांनी आपल्या न्याय व हक्कांसाठी एकत्र येऊन लढा उभारण्याच्या हेतूने सांताक्रूझ पूर्व, वाकोला येथील मोबाय गावठाण पंचायतीच्या पुढाकाराने सर्व स्थानिक भूमिपुत्र म्हणजे कोळी, आगरी, ईस्ट इंडियन यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली.

यावेळी आगरी समाजाचे सागर पाटील, नीलेश पाटील, कोळी समाजाचे मोहित रामले, भावेश वैती, अभिषेक वैती तर ईस्ट इंडियन समाजाचे नील परेरा, ब्रिस रॉड्रिक्स या तरुणांनी एकत्र येत एकी संघटनेची स्थापना केली.

अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघटना यांनीदेखील स्थानिक भूमिपुत्र कोळी म्हणून एकीला पाठिंबा दर्शवला असू विविध कोळीवाड्यांत कोळी बांधव व इतर कोळी संघटना यांच्याशी चर्चा करून आगामी पालिका निवडणुकीत कोळी समाजातील हक्काचे उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती मोहित रामले यांनी दिली.

-------- --------------------------------------------

Web Title: Agari-Koli-East Indian Brothers formed an organization for justice and rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.