मुंबई- महापालिकेच्या पी. दक्षिण विभागातील महिला कर्मचारी आज महिला दिनी आनंदी झाल्या, कारण येथील सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी पुढाकार घेत, कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. याप्रसंगी अगडबंब चित्रपट फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तृप्ती भोईर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून सर्व महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक महिला कर्मचाऱ्यांनी त्यांबरोबत सेल्फी व फोटो घेतले. महिलांना कायदेशीर मार्गदर्शनही येथे करण्यात आलं.
महिला लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा, त्यातील अनेक अधिनियम इत्यादींबाबत संपूर्ण कर्मचारी वर्गाला यावेळी मार्गदर्शन केले. मनपा उप चौकशी अधिकारी अपूर्वा प्रभू ह्यांनी भाषण केले. या कार्यक्रमामुळे सदर कायदा व त्यातील अनेक प्रावधानाबद्दल माहिती देण्यात आली व प्रबोधन करण्यात आले. अनेक पुरुष कर्मचारी या कायद्याबद्दल माहिती मिळाल्याने खूप आनंदी झाले. कारण, बऱ्याच कर्मचारी वर्गाला याबद्दल माहिती नसल्याने अनावधानाने चूक होऊन कारवाईस सामोरे जावे लागत होते. प्रथमच पी दक्षिण विभागात अश्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी सहाय्य्क आयुक्त राजेश अक्रे यांचे आभार मानले.