वाढवण बंदर विरोधात कफपरेड ते झाई कोळीवाडे बंद आंदोलनाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 06:48 PM2020-12-15T18:48:04+5:302020-12-15T18:48:27+5:30

Against Wadhwan Port : मच्छिमार एकजूटीचा विजय असो

The agitation from Cuff Parade to Zai Koliwade against Wadhwan Port received an overwhelming response | वाढवण बंदर विरोधात कफपरेड ते झाई कोळीवाडे बंद आंदोलनाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

वाढवण बंदर विरोधात कफपरेड ते झाई कोळीवाडे बंद आंदोलनाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext


मनोहर कुंभेजकर

मुंबई : वाढवण बंदर विरोधात आज मुबईच्या कफ परडे ते डहाणू झाई पर्यंतचे कोळीवाडे बंद आंदोलनाला येथील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती,नॅशनल फिश वर्कर्स फोरम ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ,पालघर,  ठाणे जिल्हा मच्छिमार मध्य.सह. संघ, लि. आदिवासी एकता समिती व आदिवासी कष्टकरी समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने या बंदची हाक दिली होती.

मच्छिमार एकजूटीचा विजय असो असा एल्गार करत मुबईतील ससून डाॅक, भाऊचा धक्का ही मोठी उलाढाल करणाऱ्या व्यापारी बंदरात स्वयस्फूर्तीने पुढे येऊन मार्केट बंद करून आंदोलनाला उस्फूर्त पाठिंबा दिला अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला दिली.

कुलाबा, कफ परेड, वरळी, खारदांडा, जूहू मोरागांव, वर्सोवा, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई हे मुबईतील सर्व कोळीवाडे बंद अंदोलनात सहभागी झाले. व गावागावात साखळी, प्रभात फे-या काढून तसेच सभा घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध केला अशी माहिती किरण कोळी यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात उत्तन या कोळीवाड्यात देखील आंदोलनात येथील कोळी बांधवांनी उस्फूर्त सहभाग घेतला. तर पालघर जिल्ह्यातील वसई पाचू बंदर, नायगाव,खोचिवडे,अर्नाळा, दातीवरे,कोरे,एडवण, उसरणी, के. दांडा,केळवा, के. दादर , के. माहीम, टेम्भी, वडराई, शिरगाव, सातपाटी, खारेकुरण, मुरबे,नवापूर, नांदगाव, आलेवाडी, दांडी, उच्छेळी, घिवली, कंबोडा, तारापूर, चिंचणी, चिंचणी दांडेपडा, वरोर, वाढवण, गुंगवडा, धाकटी डहाणू, डहाणू, नरपड,चिखला, घोलवड, बोर्डी, झाई गावात बंद करून निषेध केला अशी माहिती नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी दिली.

पालघर येथे महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती कार्याध्यक्ष  रामकृष्ण तांडेल, सचिव मोरेश्वर वैती, ज्योती मेहेर, पुर्णिमा मेहेर, दर्शना पाघधरे, रेखा तरे, हर्षदा तरे, प्राची नाईक, राजन मेहेर, फिलिप मस्तान, जगदीश नाईक,ठाणे जिल्हा मच्छिमार सहकारी संघ अध्यक्ष जयकुमार भाय,गणेश तांडेल, गणेश  वैभव वझे, मानवेंद्र आरेकर,धनंजय तरे,प्रशांत नाईक, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष नारायण पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत मोरे, सचिव वैभव वझे नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे  अध्यक्ष नरेंद्र पाटील तर ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, वेलेरिन पांडीक, विल्यम यांनी वसई पाचू बंदर व उत्तन,अर्नाळा येथे तर मुबईत सरचिटणीस किरण कोळी, मोरेश्वर पाटील, उज्वला पाटील, दिलिप पागघरे, भुनेश्वर धनु, जयेश भोईर, परशुराम मेहेर, राजेश्री भानजी, राजेश्री नाखवा इत्यादी नेते व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

काय आहेत समस्या

एकाच वेळा ३५ कंटेनर जहाजे उभी राहतील. असे आशिया खंडातील सर्वात मोठे जेएनपिटी द्वारे वाढवण बंदर विकसीत करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. मुंबई ते गुजरातच्या कच्छ व पुढे पाकिस्तानच्या कराची पर्यंत उथळ समुद्र आहे. उथळ समुद्राला भरती ओहटीला प्रहार (करंट) जास्त असतो. त्यामुळे हा परिसर मत्स्य उत्पादन, मत्स्य सवर्धन, तसेच मत्स्य प्रजनन करिता गोल्डन बेल्ट समजला जातो. वाढवण बंदर विकसीत झाल्यास मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील किमान ९००० ते १०००० हजार मासेमारी नौकांधारक व त्यावर अवलंबून असलेली किमान १० लाख नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल. त्याच बरोबर शेतकरी, बागायतदार, डायमेकर्स, लहान उद्योग करणारे देशोधडीला लागणार आहेत 

निल क्रांती योजना अंतर्गत केंद्र सरकारने व राज्य सरकारची २६% (महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड) भागिदारी असलेले विनाशकारी प्रस्तावित वाढवण बंदर आहे. समुद्रात सुमारे 5000 एकर जागेत भराव करण्यात येणार असल्याने लगतच्या गावांमध्ये पाणी शिरून येथील नागरिक विस्थापित होणार आहे. तर वाढवण बंदरच्या परिसरातील लाखो तिवरांच्या झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. या सागरी पट्यात दाढा,घोळ,रावस,पापलेट,बोंबील, शिवंड अशी मिळणारी मौल्यवान मासळी संपुष्टात येणार आहे.
 

Web Title: The agitation from Cuff Parade to Zai Koliwade against Wadhwan Port received an overwhelming response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.