मोनोरेलच्या तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:07 AM2020-12-30T04:07:47+5:302020-12-30T04:07:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मोनोरेलच्या १७ स्थानकांवर तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या सुमारे ३१ कर्मचाऱ्यांनी दरमहा वेतन मिळावे, यासह ...

The agitation of the employees at the ticket counter of the monorail | मोनोरेलच्या तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मोनोरेलच्या तिकीट काउंटरवरील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोनोरेलच्या १७ स्थानकांवर तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या सुमारे ३१ कर्मचाऱ्यांनी दरमहा वेतन मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी वडाळा आरटीओ येथे कामबंद आंदोलन केले. वडाळा डेपो येथे आंदोलनास परवानगी मिळत नसल्याने संबंधितांनी वडाळा आरटीओ येथे एकत्र येत न्यायाची मागणी केली.

आंदाेलनाच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांचे सुपरवायझर, तत्सम कर्मचाऱ्यांनी काम केले. दरमहा वेतन मिळावे, या मागणीसह ऑफर लेटर द्यावे, वेतनातून नेमकी किती रक्कम कापली जाते, याची माहिती द्यावी, अपाॅइंटमेंट लेटरमध्ये रजा आणि तत्सम घटकांचा समावेश असावा, रजा आणि पगार यांचा ताळमेळ घालण्यात यावा, कोरोना काळातील विम्याचा कर्मचाऱ्यांसाठी विचार करण्यात यावा. वेतनाची स्लिप मिळावी, अशा अनेक मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या.

............................

Web Title: The agitation of the employees at the ticket counter of the monorail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.