नागपाड्यातील आंदोलन सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 07:09 AM2020-03-17T07:09:24+5:302020-03-17T07:09:46+5:30
सीएए, एनपीआर व एनआरसीविरोधात नागपाडा येथील मोरलँड रस्त्यावर २६ जानेवारीपासून महिलांचे आंदोलन सुरू आहे.
मुंबई : जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र नागपाड्यातील महिला आंदोलनावर त्याचा फरक पडलेला दिसत नाही.
सीएए, एनपीआर व एनआरसीविरोधात नागपाडा येथील मोरलँड रस्त्यावर २६ जानेवारीपासून महिलांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पहिल्या दिवसापासून सहभागी असलेली इक्रा टेमरेकर ही आंदोलक विद्यार्थिनी म्हणाली, कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र आम्ही सुरुवातीपासून बुरख्यामध्ये आहोत. त्यामुळे मास्क लावण्याची गरज नाही. आम्ही पाच वेळा या ठिकाणी नमाज अदा करतो. त्यामुळे त्यासाठी आम्हाला वजू करावी लागते. त्यामुळे हात, पाय, चेहरा दिवसातून पाच वेळा आपसूकच धुतला जातो. कोरोना टाळण्यासाठी आमच्याकडून याप्रकारे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरूठेवले आहे.
अब्दुल बारी खान म्हणाले, पूर्वीप्रमाणे सध्यादेखील महिलांची गर्दी कायम आहे. आंदोलनाला ५० दिवस होत असल्याच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहीम, धरणे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.