झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी ११ सप्टेंबरला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:06 AM2021-09-10T04:06:33+5:302021-09-10T04:06:33+5:30

मनोहर कुंभेजकर मुंबई : मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी आता खासदार आक्रमक झाले आहेत. नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे याकरता ...

An agitation on September 11 to get justice for slum dwellers | झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी ११ सप्टेंबरला आंदोलन

झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी ११ सप्टेंबरला आंदोलन

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई : मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी आता खासदार आक्रमक झाले आहेत. नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे याकरता येत्या ११ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा पवित्रा हाती घेण्यात आला आहे. उत्तर मुंबईच्या सहा विधानसभा मतदारसंघांसह संपूर्ण मुंबईत सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत आंदोलन छेडणार असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.

२०१७ साली राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरए संबंधित कायद्यात सुधारणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्न म्हणजेच २०२२ पर्यंत सर्व नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळण्यासाठी आणि मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. त्यानंतर सरकार बदलले, पक्षभेद दूर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, अजूनही सदर कायदा लागू झाला नाही, तर मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांकडे पुरावे असूनसुद्धा त्यांना एसआरएचे घर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सदर सुधारित कायद्याची लवकर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक झाले आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याबरोबर यासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. यावर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीची कारवाई करण्याचे आदेश दिले, अशी माहिती दिली.

यावेळी खासदार शेट्टी यांच्यासोबत जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मुंबई भाजप सचिव विनोद शेलार, जिल्हा सरचिटणीस दिलीप पंडित, निखिल व्यास यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

२६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना २०१७ च्या नवीन झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी साकडे घातले होते.

आता आराध्य दैवत गणपती बाप्पा तू सदर कायद्याची अंमलबजावणी करण्याची सुबुद्धी या सरकारला दे आणि झोपडपट्टीतील गोरगरिबांना लवकर न्याय दे, यासाठी ऐन गणपतीतच आपण आंदोलनाचा श्रीगणेशा करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा आणि झोपडपट्टी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी झोपडपट्टीतील काही नागरिक, तसेच प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांची नकारात्मकता व दिरंगाई सर्व दूर करून लवकरात लवकर मुंबई शहराला झोपडपट्टीमुक्त केले पाहिजे.

-गोपाळ शेट्टी, खासदार

Web Title: An agitation on September 11 to get justice for slum dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.