- अक्षय चोरगे मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती बंद केल्यानंतर, चेंबूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील (टिस) विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. २१ फेब्रुवारीला सुरू झालेल्या या आंदोलनाला बुधवारी ५० दिवस पूर्ण झाली. सुरुवातीचे २५ दिवस टिसच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता आंदोलनाचे स्वरूप बदलले आहे. त्यानुसार, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषणाची तयारी सुरू केली आहे.केंद्र सरकारातर्फे देशभरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी ठरावीक उत्पादन मर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती बंद करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला, तसेच टिसमधील मागासर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि खानावळ शुल्क वाढविण्यात आले. त्यामुळे टिसमधील विद्यार्थ्यांनी लेक्चरवर बहिष्कार टाकत आंदोलन पुकारले, परंतु २५ दिवसांनंतर आंदोलन वेगळ्या मार्गाने पुढे नेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. दरम्यान, मागासवर्गीयांसाठी असलेल्या सवलती मिळाव्या, यासाठी इतर मागासवर्गीयांनी या आंदोलनात उडी घेतली आहे.मागील ५० दिवसांत टिसमधील विद्यार्थ्यांनी विविध नेत्यांच्या भेटी घेत, त्यांच्यासमोर आपली गाºहाणी मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्यायमंत्री तन्वरसिंग गहलोत, राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार कपील पाटील, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भेटून विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न मांडले.>समित्यांसोबत चर्चेसाठी गटविद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा कशी सुरू करता येईल? टिस प्रशासनाकडे पैसे नाहीत, अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते, त्यामुळे टिस प्रशासनाकडे पैसे कसे येतील? याचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. हा गट टिसच्या अॅडमिनिस्ट्रेशन आणि टिस प्रशासनाच्या समितीसोबत चर्चा करण्याचे काम पाहतो.जनसंपर्कासाठी स्वतंत्र व्यवस्थाजनसंपर्काची कामे पाहण्यासाठी आंदोलक विद्यार्थ्यांनी विशेष गट तयार केला आहे. हा गट देशभरातील विविध विद्यापीठांमधील, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून आंदोलन राष्टÑव्यापी करण्याच्या तयारीत आहे. या गटामुळेच आयआयटी बॉम्बे, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीमधील विद्यार्थी टिसच्या आंदोलनाशी जोडले गेले.
‘टिस’मधील विद्यार्थ्यांचे ५० दिवसांनंतरही आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 2:32 AM