Join us

कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडव : पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 11:22 AM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचं ट्विट करुन सांगितलं आहे.

मुंबई- मुंबईतील लोअर परळमध्ये असलेल्याकमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांनी आपला जीव गमावला. तर 12 जण जखमी झाली आहेत. गुरूवारी रात्री उशिरा घडलेल्या या दुर्घटनेबद्दल सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचं ट्विट करुन सांगितलं आहे.  या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांना अनेक नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबईमधील आगीची बातमी धक्कादायक आहे. ज्यांनी या आगीत जीव गमावला आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच जे यामध्ये जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो अशी इच्छा व्यक्त करतो, असं ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलंय. तसंच कमला मिल्समधील या अग्नितांडवात जीवाची पर्वा न करता आगीत अडकलेल्यांची सुखरुप सुटका करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांची आणि बचावकार्यात सहभागी असणाऱ्या पोलीस दलातील जवांनाच्या धाडसाची रामनाथ कोविंद यांनी स्तुती केली आहे. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पंतप्रधान या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून मोदींची प्रतिक्रिया ट्विट करण्यात आली आहे. मुंबईतील आगीची बातमी पाहून व्याकूळ झालो. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होवो अशी इच्छा व्यक्त करतो, असं ट्विट पीएमओच्या अकाऊण्टवरून करण्यात आलं आहे.

 

कमला मिलमधील आगीच्या सखोल चौकशीचे आदेश मुंबई माहानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये मृतांना श्रद्धांजली वाहिली. कमला मिलमधील आगीत जीवितहानी झाल्याच्या घटनेमुळे दु:ख झालं आहे. ज्यांनी आपल्या जवळचे लोक गामावले आहेत माझी सहानभूती त्यांच्याबरोबर आहे. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

 

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवकमलामिल्सदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीरामनाथ कोविंद