अग्नितांडव :मुंबईकरांनो इथे लक्ष द्या...आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:54 AM2018-01-08T02:54:48+5:302018-01-08T02:56:04+5:30
कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबईकरांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांमधील बरेचसे लोक हे गुदमरून मृत पावले होते.
मुंबई : कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबईकरांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांमधील बरेचसे लोक हे गुदमरून मृत पावले होते. त्यामुळे त्यापैकी कोणी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले असते, तर कदाचित त्या व्यक्तीने स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचवला असता, असे मत तज्ज्ञांनी मांडले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण गरजेचे असल्याची बाब पुन्हा एकदा निदर्शनास आली.
आग लागणे, नैसर्गिक आपत्ती ओढवणे, पूर येणे, किंवा गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होणे या दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेचे अनेक उपाय अवलंबले जातात. प्रत्येक नागरिकाला आपत्ती काळात काय करावे? आग लागल्यानंतर काय करावे? याबाबतचे प्रशिक्षण गरजेचे आहे. याबाबत प्रत्येकाने प्रशिक्षण घ्यायला हवे. परंतु मुंबईकरांमध्ये या प्रशिक्षणांबात निरुत्साह पाहायला मिळतो.
हे करू नका-
एखाद्या व्यक्तीच्या शरीराला आग लागल्यास पडदा किंवा जाड कापडाने आग विझवावी. पाणी टाकल्यास पाण्यामुळे शरीरावर पाण्याचे फोड येण्याची शक्यता आहे.
हॉटेल, आस्थापना, सोसायट्यांमधील ये-जा करण्याच्या मार्गात अडथळा होईल, अशा कोणत्याही वस्तू ठेवू नये. भिंतीवर बाहेर जाण्यासाठीचे मार्गदर्शक फलक असावे.
पायºयांजवळचे फायर डोअर नेहमी बंद असावेत. जर ते उघडे राहिले तर आग लागल्यानंतर उष्णता आणि धूर पायºयांमध्ये पसरेल, ज्यामुळे बाहेर पडणारे लोक गुदमरू शकतात.
दिवाळीच्या काळात लवकर पेट घेईल असे साहित्य किंवा सुके कपडे घराच्या बाल्कनीमध्ये ठेवू नयेत.
आगीच्या घटना घडल्यानंतर इमारतींच्या भुयारात प्रवेश करू नये.
फायर डिटेक्टर किंवा स्प्रिंकलर्सना रंग लावू नये, त्यामुळे ते नादुरुस्त होतील.
लवकर पेट घेतील अशा वस्तूंचा वापर करून भिंती किंवा सेलिंगना सजवू नये.
आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीची वीज बंद करू नये. तसे केल्यास अग्निप्रतिबंधक यंत्रणाही बंद होईल.
हे करा-
आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घ्यावे
आगीतून धूर वाढला तर कापड ओले करून नाकाला बांधावे, जमिनीवरून हातांच्या कोपराच्या साहाय्याने (क्रोल) पुढे जावे.
फायर अलार्म वाजल्यानंतर लगेच बाहेर पडा. लिफ्टऐवजी पायºयांचा वापर करावा.
फायर लिफ्टसह सर्व लिफ्ट जमिनीवर न्याव्या.
ड्रीलचा सराव
करावा. लक्षात ठेवा, अग्निशमन दलाचा कर्मचारी तुमचा मित्र असतो.
आगीची तीव्रता कमी असो वा जास्त, सर्वात अगोदर त्याबाबत अग्निशमन दलाला त्याची माहिती द्या.