‘आजीओ’ने आणली देशातील सर्वांत मोठी ‘बिग बोल्ड सेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:31+5:302021-07-01T04:06:31+5:30

मुंबई : कपड्यांच्या नवनव्या स्टाइल आणि ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेली ‘आजीओ’ ही देशातील आघाडीची ऑनलाइन ई-रीटेलर कंपनी भन्नाट ऑफर घेऊन ...

AGO launches country's largest 'Big Bold Cell' | ‘आजीओ’ने आणली देशातील सर्वांत मोठी ‘बिग बोल्ड सेल’

‘आजीओ’ने आणली देशातील सर्वांत मोठी ‘बिग बोल्ड सेल’

Next

मुंबई : कपड्यांच्या नवनव्या स्टाइल आणि ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेली ‘आजीओ’ ही देशातील आघाडीची ऑनलाइन ई-रीटेलर कंपनी भन्नाट ऑफर घेऊन ग्राहकांच्या भेटीला आली आहे. १ ते ५ जुलैदरम्यान चालणाऱ्या या ‘बिग बोल्ड’ सेलमध्ये सर्व प्रकारच्या कपड्यांवर जवळपास ५० ते ९० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.

देशातील आजवरच्या या सर्वात मोठ्या सेलमध्ये अडीच हजारांहून अधिक ब्रँड्स आणि सहा लाखांहून अधिक स्टाइलचे कपडे उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रकारातील उत्पादनांवर ५० ते ९० टक्के सूट देण्यात येणार असल्याने ग्राहकांना मनमुराद खरेदीचा आनंद लुटता येणार आहे.

कमीत कमी किमतीत दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. आजवर कधीही न ऐकलेल्या भन्नाट ऑफर्ससह प्रत्येक तासाला खास डील्स, रीवॉर्ड्स आणि पॉइंट्स मिळणार आहेत. ‘आजीओ’च्या ‘बिग बोल्ड’ सेलमध्ये नाइके, पुमा, अदिदास, लीव्हाइस, युनायटेड कलर्स ऑफ बेनेटन यांसह जगभरातील अत्यंत लोकप्रिय ब्रँड्सच्या हटके स्टाइल अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिल्या जातील.

अभिनेत्री सोनम कपूर, गुरू रंधावा, श्रुती हसन, काजल अग्रवाल आणि मौनी रॉय हे यूथ आयकॉन या सेलमध्ये स्टाइलचे नवे पैलू उलगडून दाखवतील. नवनवीन आंतरराष्ट्रीय ब्रँड स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी ‘आजीओ’ने उचललेले पाऊल ग्राहकांसाठी मात्र एक पर्वणी ठरणार आहे.

सर्व वयोगटांसाठी विशेष दालन

सर्व वयोगटातील स्त्री आणि पुरुषांसाठी या सेलमध्ये विशेष ऑनलाइन दालन असेल. ५० ते ९० टक्क्यांनी कमी झालेल्या किमतीत टी-शर्ट, जीन्स, कुर्ता आणि स्नीकर्स यांसह आवडत्या प्रकारातील कपडे खरेदी करता येतील. खरेदीची आवड असूनही कोरोनामुळे हिरमोड झालेल्या ग्राहकांसाठी ही ऑफर नवा आनंद देणारी ठरणार आहे.

Web Title: AGO launches country's largest 'Big Bold Cell'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.