'भाजप भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करणारा आणि दंगली घडवणारा कारखाना'; सामनातून भाजपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 10:24 AM2023-05-17T10:24:57+5:302023-05-17T10:57:26+5:30
सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
मुंबई- मिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून राज्यात दंगलीचे प्रकार वाढले आहेत. दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या भाजायच्या हा भाजपचा पीढीजात व्यवसाय आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. "निवडणुका जवळ आल्या की धंद्यातील गुंतवणूक वाढवली जाते. भाजप हा भ्रष्ठाचाऱ्यांना शुद्ध करणारा आणि दंगली घडवणारा कारखाना असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
मिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात दंगली वाढल्या आहेत. राज्यात दंगलीची प्रयोगशाळा उघडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रकार सुरू आहे. भाजप मतांच धृवीकरण करत आहे, असा निशाणा भाजपवर साधला आहे.
"ज्यांची सत्ता दंगलीच्या ज्वालेतून निर्माण झाली त्यांना दंगलीचे व धार्मिक तणावांचे प्रेम असणारच, पण देशाची जनता आता अशा तणावास विटली आहे. महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा उघडून भाजप व त्यांचे पुरस्कर्ते सामाजिक सलोखा बिघडवून मतांचे ध्रुवीकरण करू पाहत आहेत. काही विषय सामंजस्याने, सलोख्याने सोडवले जाऊ शकतात; पण शिवसेना फोडून राज्य केले जात आहे, त्याप्रमाणे समाज फोडून त्यांना निवडणुका लढवायच्या असाव्यात. भारतीय संविधान, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा यांची ऐशी की तैशी करून सत्ता भोगणारे गारदी सभोवती वावरत आहेत. राज्यातील जनतेने महाराष्ट्र हितासाठी सावध राहावे, असंही अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेखात काय म्हटले आहे?
महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जातीय आणि धार्मिक दंगलींचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे वाऱ्यावर आहेत आणि गृहमंत्री फडणवीस नावालाच आहेत असेच एकंदरीत दिसते. दंगली पेटवून राजकीय भाकऱ्या शेकायच्या हा भाजपचा पिढीजात धंदा आहे व निवडणुका जवळ आल्या की या धंद्यातील गुंतवणुकीत वाढ केली जाते. असे गुंतवणूकदार आता आपल्या राज्यात घुसले आहेत. म्हणूनच आम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते. विदर्भातील अकोला येथे शनिवारी दोन गटांत दंगलीचा भडका उडाला. किरकोळ वादातून हाणामारी व त्यातून दंगलीची आग भडकली. ही दंगल हाताळण्यात पोलीस कमी पडले. सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आणि त्यातून वादाला सुरुवात झाली. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला.
अकोला येथे सध्या 144 कलम लागू करण्यात आले आहे. तथापि संपूर्ण शहरात या हिंसाचारामुळे भीतीचे सावट आहे. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टवरून अकोल्यात एक दंगल उसळली व अकोला शहर दोन दिवस धुमसत राहिले. हे धुमसणे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रकृतीला मानवणारे नाही, पण महाराष्ट्र धुमसत राहावा याचे योजनाबद्ध नियोजन पडद्यामागून सुरू आहे. अकोल्यापाठोपाठ नगर जिल्हय़ातील शेवगाव येथेही हिंसाचार झाला. रविवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली व प्रकरण नियंत्रणाबाहेर गेले. शेवगावच्या दंगलीत पोलीस जखमी झाले. शेवगावात हे सर्व घडत असताना नाशिक जिल्हय़ातील त्र्यंबकेश्वर मंदिरात निर्माण झाले.