Join us

बारामतीमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अजित पवारांचे केले कौतुक, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 4:36 PM

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बारामतीमध्ये जाऊन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले आहे. 

मुंबई-  गेल्या काही दिवसापासून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हिवाळी अधिवेशनात शिंदे गटातील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती, तर काही दिवसापूर्वी मंत्री सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरला होता. यावरुन राज्यभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. आता कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बारामतीमध्ये जाऊन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले आहे. 

बारामती येथे कृषी प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनासाला राज्यभरातून नेते मंडळींसह शेतकरी भेट देत आहेत. आज राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाला भेट देऊन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले आहे. 

शिंंदे गटाच्या 'या' ३ खासदारांना लॉटरी, केंद्रात मंत्रीपद मिळणार?; लवकरच विस्तार

एवढे मोठे कृषी प्रदर्शन राज्यात कुठेही होत नाही. मी पवार साहेब यांची कामाची पद्धत पाहिली. पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेली मदत कधीच विसरता येणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी बारामती राहून हे प्रदर्शन पाहिले पाहिजे, हे पाहून शेतकऱ्यांना अनेक गोष्टी शिकता येणार आहेत, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिली. 

बारामतीमध्ये शेतकऱ्यांसाठी अजित पवार यांनी मोठं काम केले आहे.  मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना बारामतीमध्ये शिकण्यासाठी बरेच मिळेल. यासाठी आम्ही अजित पवार यांना विनंती करणार आहे. शेतकरी येथून शिकून गेले तर त्यांना भरपूर काही गोष्टी शिकता येणार आहेत. बारामती येथे शेती क्षेत्रात अजित पवारांनी मोठं काम केले आहे, असं कौतुकही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसअब्दुल सत्तार