Eknath Shinde vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना डिवचले! मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिंदे, फडणवीसांचे मोठमोठाले कटआऊट लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:42 PM2023-01-17T12:42:37+5:302023-01-17T12:43:59+5:30

19 जानेवारीला मोदी विविध प्रकल्पांसाठी पायाभरणी करण्यासाठी आणि शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. 

Ahead of PM Narendra Modi's mumbai visit, Eknath Shinde, Devendra Fadanvis cutouts appear near Uddhav Thackeray's residence Matoshree, Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना डिवचले! मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिंदे, फडणवीसांचे मोठमोठाले कटआऊट लागले

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना डिवचले! मोदींच्या दौऱ्यापूर्वी मातोश्रीबाहेर शिंदे, फडणवीसांचे मोठमोठाले कटआऊट लागले

googlenewsNext

मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत. दोनच दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेची दोन शकले झाल्यावर आणि शिंदे गट भाजपासोबत सत्तेत गेल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. या दिवशी मोदी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेणाक आहेत. अशातच मुंबईत ठाकरे गटाला डिवचण्यास सुरुवात झाली आहे. 

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी भाजपा आणि शिंदे गटाने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाने थेट मातोश्रीबाहेरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटआऊट लावले आहेत. यामुळे चर्चांना उधान आले आहे. शिंदे, फडणवीसांच्या कटआऊटसोबतच शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही कटआऊट आहेत. 

"पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल आणि प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षासाठी 'अनुकूल खेळपट्टी' तयार करण्यात मदत होईल," असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यावर आता शिंदे गट आणि भाजपाचा डोळा आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पालिकेची मुदत संपली होती. यामुळे लवकरच आता निवडणुका होणार आहेत. यामुळे वांद्रे उपनगरातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराजवळ पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांचे मोठे कटआउट्स लावण्यात आले आहेत. 
19 जानेवारीला मोदी विविध प्रकल्पांसाठी पायाभरणी करण्यासाठी आणि शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. 


 

Web Title: Ahead of PM Narendra Modi's mumbai visit, Eknath Shinde, Devendra Fadanvis cutouts appear near Uddhav Thackeray's residence Matoshree, Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.