Join us

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी ठाण्यातील वातावरण तापलं, शहरातील बॅनर फाडले;पोस्टर फाडल्याचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:01 AM

शिवनेतील दोन्ही गटात आता शाखेवरुन वाद सुरू आहे.

मुंबई- शिवनेतील दोन्ही गटात आता शाखेवरुन वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील शाखेवरुन जोरदार वाद झाला. ठाकरे गटाकडे असणारी शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली, यावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. आता या शाखेला आज भेट देण्यासाठी शिवसेना ठाकर गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात जोरदार बॅनरबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे बॅनर फाडल्याचे समोर आले आहे. माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 

संगीत विश्वातही PM नरेंद्र मोदींचा 'डंका' ; 'Abundance In Millets' गाणं ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट!

ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले की, मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यांनी,"असे काहीही होणार नाही,आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे",अस मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते. आज दूपारी उद्धव साहेबांचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे.त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते.यातील 90% होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत.मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. 

"एक होर्डिंग फाडायला किमान 15 मिनिट तरी लागतात.आणि "सर्वत्र नजर असणाऱ्या" पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही.आता पोलीस मला म्हणत आहेत की,"उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!" असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आणि ठाणे पोलिसांचे आभार मानतो.ते "त्यांची ड्युटी" मोठ्या निष्ठेने करत आहेत, असं ट्विट आमदार आव्हाड यांनी केलं आहे. 

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आज मुंब्र्यात येणार

काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील ठाकरे गटाची शाखा शिंदे गटाने  ताब्यात घेतली, यामुळे जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. आज मुंब्रा येथील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे येणार आहे. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊतही असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे. शहरात संपूर्ण बॅनरबाजी सुरू आहे. 

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे